दुर्गापूजा समितींना 85 हजार अनुदान

ममता सरकारचा निर्णय : वीज बिलातही मिळणार सूट वृत्तसंस्था/ कोलकाता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पूजा समितींना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये 15 हजार रुपयांची वाढ केली आहे. याशिवाय वीज बिलामध्येही त्यांना 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे. समितींच्या संघटनांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी 70 हजार रुपये अनुदान दिले होते. तसेच […]

दुर्गापूजा समितींना 85 हजार अनुदान

ममता सरकारचा निर्णय : वीज बिलातही मिळणार सूट
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पूजा समितींना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये 15 हजार रुपयांची वाढ केली आहे. याशिवाय वीज बिलामध्येही त्यांना 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे. समितींच्या संघटनांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी 70 हजार रुपये अनुदान दिले होते. तसेच अग्निशमन परवान्यासह अन्य शुल्कातही सूट सवलत दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, पुढील वर्षी यामध्ये आणखी वाढ केली जाईल. 1 लाख अनुदान देण्याचा सरकारचा मानस आहे. 15 ऑक्टोबर रोजी पूजा कार्निव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात अशाप्रकारे 42 हजार पूजा आयोजित केल्या जातील. या कार्यक्रमात महिला आणि विद्यार्थीनींनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. व्हीआयपींमुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. त्यामुळे मी व्हीआयपी कार्डच्या विरोधात आहे. तुम्ही कोणतीही थीम तयार करा, ती पोलिसांबरोबर शेअर करा. कारण प्रसंगी होणाऱ्या चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळता येतील, असेही त्या म्हणाल्या. तर विसर्जन सोहळा 13 व 14 रोजी होणार आहे. त्यावेळी पोलीस यंत्रणेशी योग्य समन्वय ठेवा. दुर्घटना टाळण्यावर कटाक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी पोलीस व प्रशासनाला आणि समिती संघटनांना दिल्या.