8 वर्षाची लहान मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नाहटौर मधील मलकपूर येथे शुक्रवारी बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी आईसोबत जनावरांसाठी चारा गोळा करण्यासाठी जंगलात गेली असतांना ही घटना घडली आहे.

8 वर्षाची लहान मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नाहटौर मधील मलकपूर येथे शुक्रवारी बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी आईसोबत जनावरांसाठी चारा गोळा करण्यासाठी जंगलात गेली असतांना ही घटना घडली आहे. पोलीस अधिकारींनी सांगितले की, शुक्रवारी सकाळच्या सुमारास 8 वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत जनावरांसाठी चारा गोळा करण्यासाठी जंगलात जात होती. यावेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला ओढत घेऊन गेला.   

तसेच त्यांनी सांगितले की, या मुलीच्या आईने आरडाओरडा केला त्यामुळे ग्रामस्थांनी आरडाओरडा ऐकून बिबट्याचा पाठलाग केला तोपर्यंत ही लहान मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. तसेच अधिकारींनी सांगितले की तिचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.

Edited By- Dhanashri Naik

Go to Source