सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल
तर नगरसेवक पदासाठी 128 जण रिंगणात ; महाविकास आघाडी, महायुतीतील उमेदवारांमुळे चुरस वाढली
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले . त्यामुळे सावंतवाडीत आता चुरशीची लढत होणार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ८ जणांनी आणि 20 नगरसेवक जागांसाठी 128 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी भाजप तर्फे श्रद्धाराजे भोसले , शिवसेना शिंदे गटातर्फे नीता सावंत -कविटकर ,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे सीमा मठकर , काँग्रेस तर्फे साक्षी वंजारी आणि अपक्ष म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर ,भारती मोरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नगरसेवक पदासाठी भाजपने 20 जागांसाठी वीस उमेदवार, शिवसेना शिंदे गटाने 20 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने 20 ,काँग्रेसने 16 ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेचे पाच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महायुतीतील भाजप ,शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढत आहेत . त्याचबरोबर अजित पवार गट पाच जागांवर स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ,आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आघाडी केली आहे. मात्र शरद पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतील प्रत्येक जण आता स्वतंत्र निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक चुरशीची होणार आहे. याशिवाय नगरसेवक पदासाठी अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Home महत्वाची बातमी सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल
सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल
तर नगरसेवक पदासाठी 128 जण रिंगणात ; महाविकास आघाडी, महायुतीतील उमेदवारांमुळे चुरस वाढली सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले . त्यामुळे सावंतवाडीत आता चुरशीची लढत होणार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या […]
