अगसगे येथे घराची भिंत कोसळून आठ लाखाचे नुकसान

सुदैवानेच घरातील 18 जण बालबाल बचावले  वार्ताहर /अगसगे  गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अगसगे येथील आंबेडकर गल्लीतील वैजू सिद्धप्पा मैत्री व यल्लाप्पा सिद्धप्पा मैत्री यांच्या घराची भिंत कोसळून घराची पडझड झाली आहे आणि सुदैवानेच घरातील 18 जण बालबाल बचावले. या दुर्घटनेत सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. आंबेडकर गल्लीमध्ये वैजू मैत्री व यल्लाप्पा मैत्री हे दोन कुटुंबे या घरामध्ये […]

अगसगे येथे घराची भिंत कोसळून आठ लाखाचे नुकसान

सुदैवानेच घरातील 18 जण बालबाल बचावले 
वार्ताहर /अगसगे 
गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अगसगे येथील आंबेडकर गल्लीतील वैजू सिद्धप्पा मैत्री व यल्लाप्पा सिद्धप्पा मैत्री यांच्या घराची भिंत कोसळून घराची पडझड झाली आहे आणि सुदैवानेच घरातील 18 जण बालबाल बचावले. या दुर्घटनेत सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. आंबेडकर गल्लीमध्ये वैजू मैत्री व यल्लाप्पा मैत्री हे दोन कुटुंबे या घरामध्ये राहत होते. मात्र यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने घराच्या भिंती कोसळल्या आहेत. ही घटना सोमवारी रात्री 9.30 साडेनऊ वाजता घडली. भिंती कोसळल्याने घरातील धान्य, कपडे, तिजोरी, पलंग, भांडी व घरातील दैनंदिन साहित्य भिंतीखाली सापडले.
त्यामुळे सदर कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्याने इतर भिंतीही कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे ही दोन्ही कुटुंबे राहायचे तरी कुठे, असा प्रश्न या कुटुंबांवर पडला आहे. शेती व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह हे कुटुंबे करतात. मात्र आता डोक्यावरील छतच कोसळल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रा. पं. अध्यक्ष अमृत मुदेन्नावर, उपाध्यक्ष शोभा कुरेनवर, सदस्य गुंडू कुरेनवर व इतर सदस्य, तलाठी राणी पाटील, काकती सर्कल सतीश बिचगट्टी, पीडीओ एन. ए. मुजावर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसान कुटुंबीयांना शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.