बोट उलटल्याने 78 जणांचा मृत्यू

मध्य आफ्रिकन देश काँगोमधील किवू सरोवरात गुरुवारी एक बोट उलटून 78 जणांचा मृत्यू झाला. तसेच दक्षिण किवू प्रांताचे गव्हर्नर जीन-जॅक पुरसी यांनी सांगितले की, नावेमध्ये 278 लोक होते. किमान 78 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढू शकतो.

तसेच तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. देशाच्या पूर्वेकडील कितुकू बंदरापासून काही मीटर अंतरावर ही बोट उलटली. बोट आपल्या बंदरावर पोहोचणार होती, परंतु ती आपल्या पोहोचण्यापूर्वी काही अंतरावर बोट उलटली. 

तसेच या अपघातात सापडलेली बोट दक्षिण किवू प्रांतातील मिनोवा येथून उत्तर किवू प्रांतातील गोमा येथे जात होती. गोमाच्या किनाऱ्यावर पोहोचताच बोटीला अपघात होऊन ती बुडाली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

Go to Source