बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ७४ वे वार्षिक अधिवेशन देवासमध्ये २७ फेब्रुवारीपासून

शुक्रवार, २७ फेब्रुवारी: अधिवेशनाची सुरुवात ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने “शब्दस्वरांचा सुवर्ण प्रवास” या कार्यक्रमाने होईल. सायं. ६:०० वाजता होणाऱ्या या मैफलीत नामवंत कवींच्या रचनांचे गायन वैशाली बकोरे आणि राजेंद्र गलगले सादर करतील.

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ७४ वे वार्षिक अधिवेशन देवासमध्ये २७ फेब्रुवारीपासून

इतिहासाच्या पावन पाऊलखुणांनी सुवर्णमयी झालेली देवास नगरी एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली यांचे ७४ वे वार्षिक अधिवेशन आणि वार्षिक साधारण सभा येत्या २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी माळव्याच्या मातीत आयोजित करण्यात आली आहे.

 

श्रीमंत मल्हारराव पवारांच्या पराक्रमी देवास नगरीत, आई चामुंडा आणि तुळजाभवानीच्या आशीर्वादाने संपन्न होणारा हा सोहळा महाराष्ट्राबाहेर जपलेल्या ‘मराठी अस्मितेचा’ उत्सव ठरणार आहे. या अधिवेशनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि परिसंवादांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

 

कार्यक्रमाचे सविस्तर नियोजन:

शुक्रवार, २७ फेब्रुवारी: अधिवेशनाची सुरुवात ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने “शब्दस्वरांचा सुवर्ण प्रवास” या कार्यक्रमाने होईल. सायं. ६:०० वाजता होणाऱ्या या मैफलीत नामवंत कवींच्या रचनांचे गायन वैशाली बकोरे आणि राजेंद्र गलगले सादर करतील.

 

शनिवार, २८ फेब्रुवारी:

सकाळी ८:०० वा. पं. कुमार गंधर्व यांचे पौत्र पं. भुवनेश कोमकली यांच्या ‘निर्मळ निर्गुण’ या भजनांच्या मैफलीने दिवसाची सुरुवात होईल.

सकाळी १०:३० वा. अधिवेशनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा देवासचे खासदार मा. श्री. महेंद्रसिंह सोलंकी आणि आमदार श्रीमंत गायत्रीराजे पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होईल.

दुपारी १:३० वा. ‘काव्य संगम’ हा द्विभाषिक कवींचा कार्यक्रम होईल, ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक समेळ आणि सुप्रसिद्ध गीतकार श्री. स्वानंद किरकिरे यांची विशेष उपस्थिती असेल.

दुपारी २:३० वा. शब्द, सूर आणि अभिनयाची एक अद्भुत युती असलेले भावनांच्या जगातील जादूगार असलेले नामवंत कलाकार श्री अशोक समेळ आणि श्री स्वानंद किरकिरे यांची प्रकट मुलाखत ‘मुक्त संवादः कलावंतांच्या अंतरंगाचा’

सायंकाळी ५:०० वा. मुख्य अधिवेशन स्थळापासून महाराष्ट्र समाज देवासपर्यंत भव्य ‘मराठी गौरव शोभायात्रा’ काढली जाणार आहे.

सायंकाळी ६:०० वा. ‘छोटे उस्ताद’ विजेता कुमार राजयोग धुरी यांच्या ‘भक्तीरंग’ या सुश्राव्य मैफलीने दिवसाची सांगता होईल.

 

रविवार, १ मार्च: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सकाळी ९:३० वाजता वार्षिक साधारण सभा होईल. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता कार्यकारिणी सत्र २०२६-२०२९ साठी मतदान प्रक्रिया पार पडेल. दुपारच्या सत्रात महिलांसाठी विशेष कार्यक्रम आणि मुक्तमंच आयोजित करण्यात आला असून, निवडणूक निकालांच्या घोषणेनंतर अधिवेशनाचा समारोप होईल.

 

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने सर्व वैयक्तिक आणि संस्थागत सभासदांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यात आले आहे.

Go to Source