काकतीत 74.87 टक्के उत्स्फूर्त मतदान
वार्ताहर /काकती
चिकोडी लोकसभा मतदान क्षेत्रासाठी काकतीत 74.87 टक्के उत्स्फूर्त मतदान झाले आहे. युवावर्गासह ज्येष्ठांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. दुपारपर्यंत 65 टक्के मतदान झाले. दुपारी 4 नंतर मतदान थंडावले. मतदान केंद्र 194 मध्ये 84.53 टक्के मतदान तर 198 मतदान केंद्रात 81.68 टक्के झाले आहे. 23 एप्रिल 2019 मध्ये झालेल्या मतदानापेक्षा 1.26 टक्के अधिक मतदान झाले आहे. 2019 साली 73.61 टक्के मतदान झाले होते. सोनट्टी मतदार केंद्रात 771 पैकी 703 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काकतीत 13,877 एकूण मतदारांपैकी 10390 विक्रमी मतदान झाले आहे. मतदारांना मतदानाचे महत्त्व पटले असल्याने माझे मत राष्ट्राचे भविष्य बदलू शकते. म्हणून राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदान झाले आहे.
Home महत्वाची बातमी काकतीत 74.87 टक्के उत्स्फूर्त मतदान
काकतीत 74.87 टक्के उत्स्फूर्त मतदान
वार्ताहर /काकती चिकोडी लोकसभा मतदान क्षेत्रासाठी काकतीत 74.87 टक्के उत्स्फूर्त मतदान झाले आहे. युवावर्गासह ज्येष्ठांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. दुपारपर्यंत 65 टक्के मतदान झाले. दुपारी 4 नंतर मतदान थंडावले. मतदान केंद्र 194 मध्ये 84.53 टक्के मतदान तर 198 मतदान केंद्रात 81.68 टक्के झाले आहे. 23 एप्रिल 2019 मध्ये झालेल्या […]