काँग्रेसच्या खात्यातून 65 कोटींची वसुली

प्राप्तिकर विभागाचा काँग्रेसला मोठा धक्का वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्राप्तिकर विभागाने (आयटी) काँग्रेसकडून 115 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी 65 कोटी रुपयांची करवसुली केली आहे. प्राप्तिकर विभागाने मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यातून ही रक्कम वजा केली आहे. आयटी विभागाने पक्षावरील कर थकबाकीच्या वसुलीच्या कारणास्तव ही खाती ओळखल्यामुळे विभागाकडून […]

काँग्रेसच्या खात्यातून 65 कोटींची वसुली

प्राप्तिकर विभागाचा काँग्रेसला मोठा धक्का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्राप्तिकर विभागाने (आयटी) काँग्रेसकडून 115 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी 65 कोटी रुपयांची करवसुली केली आहे. प्राप्तिकर विभागाने मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यातून ही रक्कम वजा केली आहे.
आयटी विभागाने पक्षावरील कर थकबाकीच्या वसुलीच्या कारणास्तव ही खाती ओळखल्यामुळे विभागाकडून पुढील कारवाई करण्यात आली. सामान्यत: अशी कारवाई एखाद्या खात्यातील देय शुल्क किंवा थकबाकीच्या रकमेच्या वसुलीच्या संदर्भात केली जाते. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस पक्षानेही यावर झटपट निर्णय घेत त्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी विभागीय कारवाईला विरोध करत प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरणात तक्रार दाखल केली आहे. दाखल केलेला स्थगिती अर्ज निकाली निघेपर्यंत प्राप्तिकर विभागाने प्रतीक्षा करायला हवी होती, असा युक्तिवादही काँग्रेसने केला. प्राप्तिकर विभागाने खंडपीठासमोर होणाऱ्या सुनावणीच्या निकालाची वाट पाहिली नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने तक्रारीत केला आहे. याआधीही पक्षाच्या बँक खात्यांमधून सध्याच्या शिल्लक रकमेपैकी काही रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.