सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत 62 टक्के वाढ
2024 आर्थिक वर्षातली कामगिरी : 6792 दशलक्ष डॉलर्सच्या दागिन्यांची निर्यात
मुंबई : आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतातून होणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीमध्ये 62 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जेम अँड जेल ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताने 6792 दशलक्ष डॉलर्सच्या सोन्याच्या दागिन्यांची निर्यात केली आहे. एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये मात्र एकंदर सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीमध्ये दहा टक्के इतकी घसरण झाली होती. त्यानंतर मात्र निर्यातीमध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. प्लॅटिनमयुक्त सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत मात्र दणदणीत वाढ दिसून आली आहे.
कोणत्या देशांना केली निर्यात
सोन्याच्या दागिन्यांची सर्वाधिक निर्यात ही भारताने संयुक्त अरब अमिरात या देशाला केली आहे. या देशाला निर्यात जवळपास 107 टक्के इतकी वाढली असून 4528 दशलक्ष डॉलर्सच्या सोन्याच्या दागिन्यांची निर्यात सदरच्या देशाला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये करण्यात आली आहे. या आधीच्या आर्थिक वर्षामध्ये संयुक्त अरब अमिरातला 2185 दशलक्ष डॉलर्सच्या सोन्याच्या दागिन्यांची निर्यात केली होती. भारताच्या एकंदर सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीपैकी 85 टक्के दागिने हे संयुक्त अरब अमिरात आणि बहारेन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठवले जातात.
Home महत्वाची बातमी सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत 62 टक्के वाढ
सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत 62 टक्के वाढ
2024 आर्थिक वर्षातली कामगिरी : 6792 दशलक्ष डॉलर्सच्या दागिन्यांची निर्यात मुंबई : आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतातून होणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीमध्ये 62 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जेम अँड जेल ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताने 6792 दशलक्ष डॉलर्सच्या सोन्याच्या दागिन्यांची निर्यात […]