61 वर्षीय टॉम क्रूज पुन्हा प्रेमात

यापूर्वी झाले आहेत तीन विवाह हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता टॉम क्रूज  पुन्हा प्रेमात पडला असल्याचे वृत्त समोर आले आहे. यावेळी टॉम एका रशियन सुंदरीच्या प्रेमात पडला आहे. 61 वर्षीय टॉमच्या आयुष्यात 36 वर्षीय रशियन सोशलाइट इल्सिना खायरोव्हाने प्रवेश केला आहे. टॉमने स्वत:च्या या नात्याची अधिकृत घोषणा देखील केली आहे. एल्सिना खायरोव्हा आणि टॉम हे रिलेशनशिपमध्ये आहेत. […]

61 वर्षीय टॉम क्रूज पुन्हा प्रेमात

यापूर्वी झाले आहेत तीन विवाह
हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता टॉम क्रूज  पुन्हा प्रेमात पडला असल्याचे वृत्त समोर आले आहे. यावेळी टॉम एका रशियन सुंदरीच्या प्रेमात पडला आहे. 61 वर्षीय टॉमच्या आयुष्यात 36 वर्षीय रशियन सोशलाइट इल्सिना खायरोव्हाने प्रवेश केला आहे. टॉमने स्वत:च्या या नात्याची अधिकृत घोषणा देखील केली आहे.
एल्सिना खायरोव्हा आणि टॉम हे रिलेशनशिपमध्ये आहेत. स्वत:ची एकत्रित छायाचित्रे कुठल्याही फोटोग्राफरच्या हाती लागू नयेत याची ते खबरदारी घेत आहेत. लंडनच्या एअर अॅम्ब्युलस चॅरिटीच्या समर्थनार्थ आयोजित डिनर पार्टीत दोघेही उपस्थित होते. यावेळी तेथे अतिथी म्हणून युवराज विलियम्स देखील पोहोचले होते. टॉम आणि एल्सिना हे दोघेही अनेकदा लंडनच्या अनेक महागड्या रेस्टॉरंट्समध्ये डिनरसाठी एकत्र पोहोचले आहेत.
टॉम हा 3 अपत्यांचा पिता आहे आणि त्याने आतापर्यंत तीन विवाह केले आहेत. टॉमने पहिला विवाह मिमी रोगर्ससोबत 1987 मध्ये केला होता. दोघेही 1990 मध्ये विभक्त झाले होते.  यानंतर टॉमच्या आयुष्यात 1990 मध्ये अभिनेत्री निकोल किडमनची एंट्री झाली आणि दोघेही 2001 मध्ये विभक्त झाले. हे नाते तुटल्यावर टॉमने सुमारे 5 वर्षांनी 2006 साली अभिनेत्री केटी होम्ससोबत विवाह केला होता. परंतु हे नातेही टिकू शकले नाही. दोघेही 2012 मध्ये विभक्त झाले होते.