पाऊस, वीज कोसळून 56 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये दुर्घटना : उत्तरेतील इतर राज्यांमध्ये पावसाचा धडाका वृत्तसंस्था /नवी दिल्ली उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये पाऊस, पूर आणि वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये गुरुवारपर्यंतच्या 24 तासात 56 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये 21 आणि झारखंडमध्ये 3 जणांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशात पूर-पावसाशी संबंधित घटनांमध्ये 32 जणांना आपला जीव […]

पाऊस, वीज कोसळून 56 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये दुर्घटना : उत्तरेतील इतर राज्यांमध्ये पावसाचा धडाका
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये पाऊस, पूर आणि वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये गुरुवारपर्यंतच्या 24 तासात 56 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये 21 आणि झारखंडमध्ये 3 जणांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशात पूर-पावसाशी संबंधित घटनांमध्ये 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यातील सुमारे 800 गावांमध्ये पूरस्थिती आहे. पीलीभीत आणि लखीमपूर खेरीमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने बिहारमध्ये मुसळधार पाऊस आणि वीज पडण्याबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यातील गंडक, कोसी, बागमती, कमला यासह अनेक नद्यांना उधाण आले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे गोपालगंज, पश्चिम चंपारणसह अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, अऊणाचल प्रदेश आणि गोव्यात अतिवृष्टीबाबत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, बंगाल, ओडिशा आणि कर्नाटकसाठी यलो अलर्ट आहे.
हिमाचलमध्ये आतापर्यंत 22 बळी
हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये मागील दोन आठवड्यात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 27 जून रोजी मान्सून दाखल झाल्यापासून अतिवृष्टीमुळे सरकारचे 172 कोटी ऊपयांचे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशच्या राज्य आपत्कालीन केंद्रानुसार, मंडी जिह्यातील 5 मुख्य रस्ते, शिमलाचे 4 आणि कांगरामधील 3 रस्ते भूस्खलनामुळे बंद करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीत बुधवारी रात्री पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. येत्या काही दिवसात दिल्लीत आणखी पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 223.37 मिमी पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण राज्याच्या वार्षिक सरासरीच्या 25.30 टक्के आहे. राज्यातील 24 तालुक्मयांमध्ये 501 मिमी ते 1,000 मिमी पावसाची नोंद झाली आहे.