Miraj Crime : मिरज ई-बस डेपोवरुन ५०० किलो लोखंडी सळ्यांची चोरी; सराईत गुन्हेगार ताब्यात
सौरभ पोतदारच्या अटकीनंतर तीन लाखांचा लोखंडी मुद्देमाल जप्त
मिरज -शहरातील कमानवेस येथे सुरू असलेल्या महापालिकेच्या ई-बस डेपो बांधकामच्या ठिकाणावरुन पाचशे किलो लोखंडी सळ्यांची चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास शहर पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले. संशयीत सौरभ प्रसाद पोतदार (वय २७, रा. म्हाडा कॉलनी, मिरज) याला अटक केली. त्याच्याकडून चोरलेल्या लोखंडी सळ्यांचा बंडल आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक छोटा हत्ती टेंपो असा तीन लाख, २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, पोतदार याच्यासोबत असलेले अन्य दोन साथीदार परागंदा झाले.कमानवेसजवळ म्हाडा कॉलनी परिसरात सातवेकर प्लॉट येथे महापालिकेचा ई-बस डेपोचाप्रकल्प सुरू आहे. सदर ठिकाणी बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडी सळ्यांचे बंडल आणि विविध बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. सदर साहित्य ठेवलेल्या ठिकाणावरुन सुमारे पाचशे किलो वजनाचे लोखंडी सळ्यांचे बंडल चोरीस गेल्याचे सोमवारी सकाळी नऊ वाजता दिसून आले.
याबाबत बांधकाम ठेकेदार नियुक्त कर्मचारी दर्शन अलगोंडा पाटील (वय २६) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस पथकाला पाचारण केले. स्थानिक चोरट्यांनीच चोरी केल्याचा संशय असल्याने सोमवारी रात्री पोलिसांनी कमानवेस परिसरात पेट्रोलिंग राबविले.
संशयित सौरभ पोतदार
यावेळी कमानवेस मार्गे आळतेकर हॉलजवळ छोटा हत्ती टेंपो (एमएच-१०-डीटी-३०२६) मधून लोखंडी सळ्यांचे बंडल वाहतुक सुरू असल्याचे पोलिसांना दिसून आले. वाहन अडवून तपासणी केल्यानंतर टेंपोमध्ये संशयित
Home महत्वाची बातमी Miraj Crime : मिरज ई-बस डेपोवरुन ५०० किलो लोखंडी सळ्यांची चोरी; सराईत गुन्हेगार ताब्यात
Miraj Crime : मिरज ई-बस डेपोवरुन ५०० किलो लोखंडी सळ्यांची चोरी; सराईत गुन्हेगार ताब्यात
सौरभ पोतदारच्या अटकीनंतर तीन लाखांचा लोखंडी मुद्देमाल जप्त मिरज -शहरातील कमानवेस येथे सुरू असलेल्या महापालिकेच्या ई-बस डेपो बांधकामच्या ठिकाणावरुन पाचशे किलो लोखंडी सळ्यांची चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास शहर पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले. संशयीत सौरभ प्रसाद पोतदार (वय २७, रा. म्हाडा कॉलनी, मिरज) याला अटक केली. त्याच्याकडून चोरलेल्या लोखंडी सळ्यांचा बंडल आणि […]
