सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातून जादा 500 क्युसेस पाणी सोडले; सुहास बाबर यांच्या प्रयत्नांना यश

विटा प्रतिनिधी कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापना बाबत आज सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर यांनी सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई भेट घेतली. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी कोयना धरणातून जादा 500 क्युसेस पाणी सोडण्याची त्यांनी मागणी केली. यानंतर तात्काळ मंत्री देसाई यांनी कोयना धरणातून जादा 500 क्यूसेस पाणी सोडण्याचे […]

सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातून जादा 500 क्युसेस पाणी सोडले; सुहास बाबर यांच्या प्रयत्नांना यश

विटा प्रतिनिधी

कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापना बाबत आज सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर यांनी सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई भेट घेतली. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी कोयना धरणातून जादा 500 क्युसेस पाणी सोडण्याची त्यांनी मागणी केली. यानंतर तात्काळ मंत्री देसाई यांनी कोयना धरणातून जादा 500 क्यूसेस पाणी सोडण्याचे आदेश दिले. आज दुपारपासूनच कोयनेतून पाणी सोडण्यात येणार आहे, असे सुहास बाबर यांनी सांगितले.
मंगळवारी मुंबई येथे सुहास बाबर यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतली. कोयना धरणातून सांगली जिल्ह्याला मिळणाऱ्या पाण्यासंदर्भात त्यांनी मंत्री देसाई यांच्याकडे सविस्तर भूमिका मांडली. यावेळी विटा नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल बाबर ,प्रकाशभाई बागल, मिथुन सगरे उपस्थित होते.
याबाबत सुहास बाबर म्हणाले, सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरलेल्या टेंभू, ताकारी व म्हैसाळ योजनांसाठी कोयना धरणातून कृष्णानदीमध्ये पाणी सोडले जाते. कोयना धरण हे या योजनांसाठी व पर्यायाने सदर भागासाठी वरदान ठरले आहे. सध्या या योजनांचे आवर्तन सुरु असून कमी पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण होणारी पाणी टंचाई दूर होऊन दुष्काळाची तीव्रता कमी होत आहे.
सध्या कोयना धरणातून या सर्व वापरासाठी २१०० क्युसेक पाणी सोडले जाते. त्यापैकी कोयणा धरण ते कराडपर्यंत उपसा योजना व कारखाने इत्यादीकडून ५०० क्युसेक पाण्याचा वापर होतो. त्यापुढे टेंभू योजनेसाठी १००० क्युसेक व ताकारी योजनेसाठी ५०० क्युसेक असे एकुण २००० क्युसेक पाणी उपसा केला जात आहे. परंतु यामुळे ताकारी योजनेपासून सांगलीपर्यंत कृष्णा नदी कोरडी पडलेली आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होऊन तासगाव, पलूस, सांगली, मिरज इत्यादी शहरांच्या पाणी पुरवठा योजना बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे कोयना धरणातून जादा ५०० क्युसेक पाणी सोडलेस सदर पाणी टंचाई दूर होईल.
त्यासाठी कोयना धरण पायथा व्हॉल्वमधून ५०० क्युसेक जादा पाणी सोडणेबाबत तात्काळ निर्णय व्हावा, अशी मागणी बाबर यांनी निवेदनात केली आहे.
यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कोयना धरणातून जादा 500 क्युसेस पाणी सोडण्याचे आदेश दिले. दुपारपासून हे पाणी सोडण्यात येणार आहे. यावर्षीची पर्जन्यमान कमी असल्याने धरणातील पाणीसाठा व पुढे निर्माण होणारी पाणी टंचाई याबाबत आपण सातत्याने लक्ष ठेवून आहे. याबाबत योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी या प्रश्न आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू, असेही सुहास बाबर यांनी सांगितले
अभिमान वाटावा असे काम
स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी पाणी या विषयावर आपले जीवन वेचले, त्यांच्याच पावलावर चालत सुहास बाबर यांनी आज याबाबत लक्ष घातले आणि न्याय देण्याचा प्रयत्न केलाआहे. त्यांना यश आले आहे. त्यांनी कामाची चुणूक दाखवत अभिमान वाटावी अशी वाटचाल सुरू केली आहे, अशा शब्दात खरेदी विक्री संघाचे संघाचे उपाध्यक्ष सदाशिव हसबे यांनी आपल्या भावना व्यक्त केला