कोडोलीत वाईन शॉपीची कडी तोडून 50 हजारांची चोरी

पोलीस ठाण्यापासून ५० मिटर वर चोरी : चोरीत सिसीटीव्हीचे साहित्य वारणानगर / प्रतिनिधी वाठार बोरपाडळे राज्यमार्गावर कोडोली ता. पन्हाळा येथील पोलीस ठाण्यापासून ५० मिटर पेक्षा कमी अंतरावर रस्त्याकडेला असलेल्या आनंद बिअर शॉपीच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने रोख ४० हजार रुपये व सी सी टिव्ही चे साहित्य असे ४९५०० चा मुद्देमाल चोरून पोबारा केला. या […]

कोडोलीत वाईन शॉपीची कडी तोडून 50 हजारांची चोरी

पोलीस ठाण्यापासून ५० मिटर वर चोरी : चोरीत सिसीटीव्हीचे साहित्य

वारणानगर / प्रतिनिधी

वाठार बोरपाडळे राज्यमार्गावर कोडोली ता. पन्हाळा येथील पोलीस ठाण्यापासून ५० मिटर पेक्षा कमी अंतरावर रस्त्याकडेला असलेल्या आनंद बिअर शॉपीच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने रोख ४० हजार रुपये व सी सी टिव्ही चे साहित्य असे ४९५०० चा मुद्देमाल चोरून पोबारा केला.
या बाबत गुरुवार दि.१८ रोजी रात्री ११ वाजले नंतर शुक्रवार दि. १९ रोजी सकाळ पर्यन्त झालेल्या या चोरीची फिर्याद प्रवीण संजय बजागे यांनी दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबत कोडोली पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, बजागे यांचे कोडोली बोरपाडळे राज्य मार्गांवर हॉटेल आनंद बियर अँड वाइन शॉपी आहे. रोजच्या प्रमाणे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळी दहा वाजता शॉपी उघडण्यास आल्यावर दरवाजाची कडी तोडलेली दिसली. आत जाऊन पाहिले असता शॉपीच्या काउंटर मधील रोख रक्कम चाळीस हजार व नऊ हजार पाचशे रु.चा सिसिटीव्हीचा युपीएस व कॅमेरा असा एकूण ४९५०० चा मुद्देमाल चोरून चोरट्याने पोबारा केला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिपुगडे करत आहेत.