लार्सन आणि टुब्रोला 5 हजार कोटीचे कंत्राट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लार्सन आणि टुब्रो या कंपनीला भारतासह पश्चिम आशियामधून मोठ्या कामाचे कंत्राट प्राप्त झाले आहे. कंपनीला ऊर्जा वितरणाशी संबंधित बांधकामाचे कंत्राट प्राप्त झाले असल्याची माहिती असून या अंतर्गत भारतासह पश्चिम आशिया मधून जवळपास अडीच हजार ते पाच हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले असल्याची माहिती लार्सन आणि टुब्रो यांनी शेअर बाजाराला दिली आहे. देशातील […]

लार्सन आणि टुब्रोला 5 हजार कोटीचे कंत्राट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लार्सन आणि टुब्रो या कंपनीला भारतासह पश्चिम आशियामधून मोठ्या कामाचे कंत्राट प्राप्त झाले आहे. कंपनीला ऊर्जा वितरणाशी संबंधित बांधकामाचे कंत्राट प्राप्त झाले असल्याची माहिती असून या अंतर्गत भारतासह पश्चिम आशिया मधून जवळपास अडीच हजार ते पाच हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले असल्याची माहिती लार्सन आणि टुब्रो यांनी शेअर बाजाराला दिली आहे.
देशातील दोन राज्यांसह इतर देशांतूनही एल अँड टीने कंत्राट मिळवण्यात यश मिळवलं आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये एका जलाशयावर प्रकल्प राबवला जाणार आहे. त्याचप्रमाणे सौदी अरबमधून देखील ऊर्जा सब स्टेशन निर्मितीचे कंत्राटही प्राप्त झाले आहे. लार्सन आणि टुब्रो ही 23 अब्ज डॉलर्स संपत्तीची बहुराष्ट्रीय कंपनी असून अभियांत्रिकीसह ऊर्जा निर्मिती व इतर प्रकल्प सेवांमध्ये कार्यरत आहे.