रेस्टारेंट मध्ये माऊथ फ्रेशनर खाल्ल्या नंतर 5 जणांना रक्ताच्या उलट्या

गुरुग्राम मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुग्रामच्या एका रेस्टोरेंट मध्ये जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर खाऊन पाच जणांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. या प्रकरणी रेस्टारेंटच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेस्टारेंट मध्ये माऊथ फ्रेशनर खाल्ल्या नंतर 5 जणांना रक्ताच्या उलट्या

social media

गुरुग्राम मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुग्रामच्या एका रेस्टोरेंट मध्ये जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर खाऊन पाच जणांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. या प्रकरणी रेस्टारेंटच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर घटना सोमवार 4 मार्च ची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित कुमार त्यांची पत्नी आणि मित्र परिवार गुरुग्रामच्या सेक्टर 90 मध्ये एका रेस्टारेंट मध्ये जेवायला गेले होते. जेवल्यानन्तर त्यांना कर्मचाऱ्यांनी माऊथ फ्रेशनर खायला दिले. ते खाल्ल्या नंतर काही वेळाने पाच जणांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि त्यांची प्रकृती बिघडू लागली. एवढे असून देखील रेस्टारेंटच्या मालकाने तसेच कर्मचाऱ्यांनी आमची कुठलीही मदत केली नाही. 

या घटनेची माहिती त्यांच्या सोबत आलेल्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी रेस्टारेंटच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहे. 

Edited by – Priya Dixit 

Go to Source