काँग्रेसकडून 5 सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समिती

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उचलले पाऊल वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अखिल भारतीय काँग्रेस समितीने मंगळवारी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 5 सदस्यीय आघाडी समिती स्थापन केली आहे. या समितीत मुकुल वासनिक, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांना स्थान देण्यात आले आहे. मुकुल वासनिक हे या समितीचे संयोजक असणार आहेत. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत […]

काँग्रेसकडून 5 सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समिती

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय काँग्रेस समितीने मंगळवारी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 5 सदस्यीय आघाडी समिती स्थापन केली आहे. या समितीत मुकुल वासनिक, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांना स्थान देण्यात आले आहे. मुकुल वासनिक हे या समितीचे संयोजक असणार आहेत.
अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव पत्करावा लागला असताना राष्ट्रीय आघाडी समितीत गेहलोत आणि बघेल यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्यावर दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय पातळीवर भूमिका देण्याचे पाऊल काँग्रेसने उचलले आहे. काँग्रेसने ‘इंडिया’च्या बैठकीपूर्वी या आघाडी समितीची स्थापना केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीकरता विविध राज्यांमध्ये कोणत्या पक्षांसोबत आघाडी करावी याचा निर्णय या समितीच्या शिफारसीवर ठरणार असल्याचे मानले जात आहे. भाजपचे तगडे आव्हान पाहता काँग्रेस यावेळी विविध राज्यांमध्ये आघाडी करण्यावर भर देत आहे. इंडिया आघाडीत जागावाटपासंबंधी मतैक्य निर्माण करण्यासाठी देखील ही समिती भूमिका बजावू शकते. परंतु राज्य पातळीवर आघाडी करण्याची स्थिती आल्यास या समितीची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
 

Go to Source