5 लाख रुग्णांनी घेतला ‘आयुष्मान’चा लाभ
जिल्ह्यात सरकारी 176 तर खासगी 62 रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय : गंभीर आजारांवरही उपचार
बेळगाव : गोरगरीब नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत आरोग्य योजना जारी केली आहे. या योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या 5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांकडून विविध आजारांवर उपचार घेतले आहेत. या योजनेतून खासगी रुग्णालयांमध्ये 178 कोटी तर सरकारी रुग्णालयांमध्ये 76 कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे. प्रत्येकाला उत्तम आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारकडून बीपीएल व एपीएल रेशनकार्डधारकांसाठी आयुष्मान भारत योजना जारी केली आहे. बीपीएल कार्डधारकांसाठी 5 लाख व एपीएल कार्डधारकांसाठी 1.50 लाख रुपये निधी उपचारासाठी खर्च दिला जात आहे. या योजनेंतर्गत नोंदणी करून घेतलेल्या नागरिकांना सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयामध्येही उपचार करून घेण्यासाठी सोय आहे. बेळगाव जिल्ह्यात सरकारच्या 176 रुग्णालयांचा तर सरकारी 62 रुग्णालयांतून आयुष्मान योजनेंतर्गत उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुष्मान कार्ड नोंदणी करून घेतलेल्या नागरिकांना वैद्यकीय उपचार देण्यास सोयीचे ठरते. यासाठी आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये 4.52 लाख नागरिकांनी उपचार करून घेतले आहेत. तर खासगी रुग्णालयांमध्ये 56 हजारपेक्षा अधिक नागरिकांनी उपचार करून घेतले आहेत. गंभीर स्वरुपाच्या दुर्धर आजारांवर या योजनेंतर्गत उपचार घेण्याची सोय आहे. हृदयविकार, बायपास सर्जरी, किडनी, गुडघ्यावर उपचार अशा गंभीर स्वरुपाच्या अनेक आजारांवर उपचार घेण्याची सोय आहे.
नागरिकांनी कार्ड नोंदणी करून घेणे आवश्यक
आयुष्मान भारत आरोग्य योजनेंतर्गत अनेक गंभीर स्वरुपांच्या आजारावर उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. यासाठी नागरिकांनी आयुष्मान भारत आरोग्य कार्ड नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. या सेवेमुळे अनेक गोरगरिबांना वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत मिळत आहे.
– डॉ. महेश कोणी, जिल्हा आरोग्याधिकारी
Home महत्वाची बातमी 5 लाख रुग्णांनी घेतला ‘आयुष्मान’चा लाभ
5 लाख रुग्णांनी घेतला ‘आयुष्मान’चा लाभ
जिल्ह्यात सरकारी 176 तर खासगी 62 रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय : गंभीर आजारांवरही उपचार बेळगाव : गोरगरीब नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत आरोग्य योजना जारी केली आहे. या योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या 5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांकडून विविध आजारांवर उपचार घेतले आहेत. या योजनेतून खासगी रुग्णालयांमध्ये 178 कोटी तर सरकारी रुग्णालयांमध्ये 76 कोटीहून अधिक […]