सोमवारी 5 इंच पावसाची नोंद
काणकोणात सर्वाधिक 7.5 इंच पाऊस : आज, उद्या ऑरेंज अलर्ट
पणजी : हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर अनेक भागातील पावसाची नोंद पाहता एकूण 13 केंद्रांपैकी गोव्यातील चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळपईतच केवळ दीड इंच एवढी अत्यल्प नोंद झाली. तर 9 केंद्रांवर 5 व त्यापेक्षा जादा इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. मंगळवारी मुसळधार पावसाचा जोर कायम होता आणि सर्वाधिक 7.5 इंच पावसाची नोंद काणकोण केंद्रावर झाली. पणजीत 7 इंच, फोंडा 6 इंच, जुने गोवे 5.5 इंच, मुरगाव 5.5 इंच, केपे 5.25 इंच, सांगे 5 इंच, मडगाव 5 इंच, दाबोळी 4.5 इंच, म्हापसा 3.5 इंच, पेडणे 3.5 इंच, सांखळी 2.5 इंच एवढी जोरदार पावसाची नोंद झाली. दिवसभरात गोव्यात सरासरी जवळपास 5 इंच पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीपेक्षा यंदा 45 टक्के जादा पाऊस पडलेला आहे. यंदाच्या मोसमातील सरासरी पावसाची नोंद आता 85.20 इंच एवढी झाली आहे. वार्षिक या कालावधीत 58.50 इंच एवढा पाऊस पडत असतो. सुमारे 25 इंच जादा पाऊस यंदा झालेला आहे.
मुसळधार पावसाची मालिका चालूच राहणार
हवामान खात्याने मंगळवारी जारी केलेल्या माहितीनुसार आज बुधवार व उद्या गुऊवार अशा दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस चालूच राहाणार आणि त्यासाठीच पुढील दोन दिवसांकरिता ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. गरज पडल्यासच घराबाहेर पडा. अन्यथा जादा बाहेर फिरण्याचा प्रयत्न कऊ नका असा सल्लाही दिलेला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहाणार असून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. गोव्यातील नद्या सध्या दुथडी भऊन वाहत आहेत आणि जादा पाऊस पडल्यास पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वाळपईत सध्या 97 इंच पावसाची नोंद झालेली आहे. वाळपई शतकाच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, अंजुणे धरणाचे चारही दरवाजे खुले करण्यात येऊन पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
Home महत्वाची बातमी सोमवारी 5 इंच पावसाची नोंद
सोमवारी 5 इंच पावसाची नोंद
काणकोणात सर्वाधिक 7.5 इंच पाऊस : आज, उद्या ऑरेंज अलर्ट पणजी : हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर अनेक भागातील पावसाची नोंद पाहता एकूण 13 केंद्रांपैकी गोव्यातील चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळपईतच केवळ दीड इंच एवढी अत्यल्प नोंद झाली. तर 9 केंद्रांवर 5 व त्यापेक्षा जादा इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. मंगळवारी मुसळधार पावसाचा जोर कायम […]