5-जी स्पेक्ट्रम लिलाव 11,000 कोटींच्या बोलीसह समाप्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मोबाईल रेडिओ तरंग सेवांसाठी 96,000 कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम लिलाव सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या बोलीसह संपला. सरकारने या लिलावात 800 एमएचझेड 900 एमएचझेड, 1,800 एमएचझेड , 2,100 एमएचझेड, 2,300एमएचझेड, 2,500 एमएचझेड, 3,300 एमएचझेड आणि 26 एमएचझेड स्पेक्ट्रम बँड ऑफर केले आहेत. सूत्राने सांगितले की, सकाळच्या सत्रात कोणतीही नवीन बोली आली नाही. लिलाव सुमारे […]

5-जी स्पेक्ट्रम लिलाव 11,000 कोटींच्या बोलीसह समाप्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोबाईल रेडिओ तरंग सेवांसाठी 96,000 कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम लिलाव सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या बोलीसह संपला. सरकारने या लिलावात 800 एमएचझेड 900 एमएचझेड, 1,800 एमएचझेड , 2,100 एमएचझेड, 2,300एमएचझेड, 2,500 एमएचझेड, 3,300 एमएचझेड आणि 26 एमएचझेड स्पेक्ट्रम बँड ऑफर केले आहेत.
सूत्राने सांगितले की, सकाळच्या सत्रात कोणतीही नवीन बोली आली नाही. लिलाव सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या बोलीसह संपला. ते म्हणाले की, भारती एअरटेल लिलावात सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी म्हणून समोर आली आहे. शेवटचा लिलाव 2022 मध्ये झाला होता जो सात दिवस चालला होता. त्यामध्ये, 1.5 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचा विक्रमी 5जी टेलिकॉम स्पेक्ट्रम विकला गेला, ज्यामध्ये अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा जिओ शीर्ष बोलीदार म्हणून उदयास आले.
सर्व रेडिओ लहरींपैकी जवळपास निम्म्या ( 88,078 कोटी किमतीचे) त्यानी मिळवले होते. त्यावेळी, दूरसंचार क्षेत्रातील सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलने 43,084 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली होती, तर व्होडाफोन-आयडियाने 18,799 कोटी रुपयांना स्पेक्ट्रम विकत घेतला होता.