बेळगाव जिल्ह्यात 485 कोटींची होणार गुंतवणूक

जय डी टेक मॅक प्रा. लि. करणार यांत्रिकृत कास्टिंग युनिट स्थापन प्रतिनिधी/ बेंगळूर राज्यभरात औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शिक्षण-संशोधन संस्था स्थापन करणे, गोदाम, शीतगृहांची निर्मिती, वाहनांचे सुटे भाग, पीव्हीसी पाईप तयार करणे यासह एकूण 6,407.82 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रस्तावांना राज्यस्तरीय सिंगल विंडो कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात 485 कोटी […]

बेळगाव जिल्ह्यात 485 कोटींची होणार गुंतवणूक

जय डी टेक मॅक प्रा. लि. करणार यांत्रिकृत कास्टिंग युनिट स्थापन
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यभरात औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शिक्षण-संशोधन संस्था स्थापन करणे, गोदाम, शीतगृहांची निर्मिती, वाहनांचे सुटे भाग, पीव्हीसी पाईप तयार करणे यासह एकूण 6,407.82 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रस्तावांना राज्यस्तरीय सिंगल विंडो कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात 485 कोटी रु. गुंतवणूक होणार आहे.
अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय सिंगल विंडो कमिटीची 143 वी बैठक पार पडली. या बैठकीत 6,407.82 कोटी रुपये भांडवल गुंतवणुकीच्या 128 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जवळपास 33,771 जणांना नोकरीच्या संधी मिळतील.
बेंगळूर ग्रामीण, बेळगाव, रामनगर आणि म्हैसूर जिल्ह्यांत गुंतवणुकीच्या विविध योजनांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या योजनेत बेळगाव जिल्ह्यात 485 कोटी रु. गुंतवणूक होणार आहे. जय डी टेक मॅक प्रा. लि. कंपनी ही गुंतवणूक करणार असून यांत्रिकृत कास्टिंग युनिट स्थापन करणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात4,85 कोटी रुपये, बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील देवनहळ्ळी येथे 485.33 कोटी रु. गुंतवणुकीतून विज्ञान-तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्य विकास केंद्र स्थापन केले जाईल. म्हैसूर जिल्ह्यात 415 कोटी रु. गुंतवणूक करून राष्ट्रीय शिक्षण समिती ट्रस्ट विद्यापीठ स्थापन करणार आहे. 50 कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या 22 योजनांना मंजुरी देण्यात आली असून यातून 4,230.64 कोटी रु. गुंतवणूक होईल. तसेच 24,846 जणांना रोजगार उपलब्ध होईल.
15 कोटींपासून 50 कोटीपर्यंत गुंतवणुकीच्या 104 नव्या योजनांना बैठकीत मंजुरी देण्यात आली असून यातून 2,056.68 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. तसेच 8,425 जणांना रोजगार मिळणार आहे.