मनपाकडून 48 कोटी 33 लाख कर वसूल
गेल्या 9 महिन्यांत विक्रमी कर जमा
बेळगाव : महानगरपालिकेने गेल्या 9 महिन्यांमध्ये 48 कोटी 33 लाख 93 हजार 463 रुपये कर जमा केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. आणखी तीन महिन्यांमध्ये किमान 10 ते 12 कोटी रुपये कर वसूल झाल्यास यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे, असे सांगण्यात आले. त्यासाठी कर्मचारी कर गोळा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती देण्यात आली. एप्रिल ते डिसेंबर 2023 पर्यंत हा कर वसूल करण्यात आला आहे. सर्वात जास्त जून महिन्यात कर वसूल केला आहे. सरकारतर्फे दरवर्षी उद्दिष्ट दिले जाते. यावर्षी जे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण होणार आहे, असे सांगण्यात आले. घरपट्टी, पाणीपट्टी, कचरा संकलन कर, व्यावसायिक कर यासह इतर कर वसूल करत असताना काहीजणांनी कर उशिराने भरला आहे. त्यामध्ये दंड वसुलीही अधिक झाली आहे. एकूण 4 कोटी 10 लाख 27 हजार 859 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
करवसुलीचा तपशील
महिना एकूण कर वसुली
एप्रिल 21,82,23,445
मे 4,51,38,495
जून 5,15,73,623
जुलै 3,70,79,287
ऑगस्ट 2,90,14,381
सप्टेंबर 1,91,09,133
ऑक्टोबर 3,66,58,029
नोव्हेंबर 2,83,13,324
डिसेंबर 1,79,83,746
एकूण 48,33,93,463
