दूतावासांवरील हल्ल्याप्रकरणी 43 संशयित

एनआयएकडून कारवाई : अमेरिका, लंडन, कॅनडातील दूतावासावर हल्ला वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमेरिका, लंडन आणि कॅनडात मार्च आणि जुलै महिन्यात भारताच्या दूतावासांना लक्ष्य करण्यात आले होते. याप्रकरणी एनआयएने आतापर्यंत 43 संशयितांची ओळख पटविली आहे. एनआयएने क्राउड सोर्सिंगद्वारे संशयितांची ओळख पटविली आहे. एनआयएने याप्रकरणी भारतात आतापर्यंत 50 हून अधिक छापे टाकत 80 जणांची चौकशी केली आहे. याप्रकरणी […]

दूतावासांवरील हल्ल्याप्रकरणी 43 संशयित

एनआयएकडून कारवाई : अमेरिका, लंडन, कॅनडातील दूतावासावर हल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिका, लंडन आणि कॅनडात मार्च आणि जुलै महिन्यात भारताच्या दूतावासांना लक्ष्य करण्यात आले होते. याप्रकरणी एनआयएने आतापर्यंत 43 संशयितांची ओळख पटविली आहे. एनआयएने क्राउड सोर्सिंगद्वारे संशयितांची ओळख पटविली आहे. एनआयएने याप्रकरणी भारतात आतापर्यंत 50 हून अधिक छापे टाकत 80 जणांची चौकशी केली आहे. याप्रकरणी एनआयएने गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदविला होता.
19 मार्च रोजी लंडन आणि 2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये खलिस्तान समर्थकांनी भारतीय दूतावासावर दोनवेळा हल्ले केले हेते. या दोन्ही प्रकरणांची चौकशी एनआयए करत आहे. भारतीय दूतावासावर गुन्हेगारी उद्देशाने अतिक्रमण, सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहोचविणे, दूतावास कर्मचाऱ्यांना नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न, जाळपोळ इत्यादी आरोपांतर्गत एनआयएने गुन्हे नोंदविले आहेत.
एनआयएच्या एका पथकाने जाळपोळ आणि हिंसक घटनांच्या चौकशीसाठी ऑगस्ट महिन्यात सॅन फ्रान्सिस्कोचा दौरा केला होता. या हिंसक घटनांमध्ये सामील अमेरिकेतील संघटना आणि व्यक्तींची ओळख पटविणे आणि त्यांच्याविषयी माहिती मिळविण्यासाठी एनआयएने क्राउड सोर्सिंग पद्धत वापरली आहे.
खलिस्तानी दहशतवादी संघटनांच्या फंडिंगप्रकरणी देखील एनआयए तपास करत आहे. अलिकडेच अनेक युवांना विदेशात नेण्यात आले होते, या सर्वांचे मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन रॅडिकलायझेशन झाले होते. या युवकांना विदेशात भारतीय दूतावासावर हल्ला करण्यासाठी चिथावणी देण्यात आली होती.