दुचाकी चोरट्याकडून चोरीच्या 4 दुचाकी जप्त; सांगली पोलिसांकडून कारवाई

इचलकरंजी / प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्यास अटक केली. राहूल प्रशांत रेणके ( रा. मराठी शाळेजवळ, कुन्नूर, ता. निपाणी, जि. बेळगाव ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या. या चार दुचाकी पैकी दोन दुचाकी त्याने शहरातील कल्याण केंद्रानजीकच्या एका बार समोरुन तर अन्य दुचाकी इंडस्टीयल इस्टेट मधील एका […]

दुचाकी चोरट्याकडून चोरीच्या 4 दुचाकी जप्त; सांगली पोलिसांकडून कारवाई

इचलकरंजी / प्रतिनिधी

शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्यास अटक केली. राहूल प्रशांत रेणके ( रा. मराठी शाळेजवळ, कुन्नूर, ता. निपाणी, जि. बेळगाव ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या. या चार दुचाकी पैकी दोन दुचाकी त्याने शहरातील कल्याण केंद्रानजीकच्या एका बार समोरुन तर अन्य दुचाकी इंडस्टीयल इस्टेट मधील एका बार जवळून आणि एका खासगी हॉस्पीटलच्या समोरुन चोरल्या होत्या. या चारही दुचाकी चोरीचे पोलीसात नोंद झाली होती.
काही दिवसापूर्वी राहूल रेणके या अट्टल दुचाकी चोरट्यास सांगली पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी सांगली पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १२ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या होत्या. त्याला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.