कंबोडियात 360 भारतीयांची गुन्हेगारांच्या तावडीतून मुक्तता
विदेशात नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक : सायबर गुन्ह्यांची केली जायची बळजबरी
वृत्तसंस्था/ नामपेन्ह
भारताने स्वत:च्या 360 नागरिकांना कंबोडियात गुन्हेगारांच्या तावडीतून मुक्तता करविली आहे. या भारतीयांना बनावट एजेन्सीने नोकरीचे आमिष दाखवून कंबोडिया येथे पाठविले होते. तेथे या भारतीयांकडून बळजबरीने सायबर फ्रॉड यासारखी कामे करविली जात होती. जिनबेई-4 नावाच्या या ठिकाणावरून त्यांना वाचविण्यात आले आहे.
भारतीय दूतावासानुसार यातील 60 नागरिकांची पहिली तुकडी मायदेशी परतली आहे. उर्वरित लोकांचे प्रवास दस्तऐवज आणि अन्य गोष्टींची तपासणी केली जात असून लवकरच त्यांना मायदेशी आणले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सिहानोकविले प्रशासनाच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आल्याचे म्हणत दूतावासाने कंबोडियाच्या सरकारचे आभार मानले आहेत. भारतीय दूतावासाने कंबोडियात नोकरी मिळवू पाहणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केवळ विदेश मंत्रालयाकडून मान्यताप्राप्त एजंटांच्या मदतीनेच नोकरीचा शोध घेण्यात यावा असे म्हणत दूतावासाने पर्यटन व्हिसावर नोकरीचा शोध घेण्यास इच्छुक लोकांना इशारा देण्यात आला आहे.
मानवतस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड
आंध्रप्रदेशने काही दिवसांपूर्वी विशाखापट्टणममध्ये एका मानवतस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड केला हेता. पोलिसांनी 18 मे रोजी 3 जणांना अटक केली होती. सिंगापूरमध्ये मोठा पगार मिळण्याचे आमिष दाखवून युवांची फसवणूक केली जात होती. या युवकांना प्रत्यक्षात कंबोडिया येथे पाठविले जात होते. कंबोडियात मानवतस्करी रॅकेटच्या जाळ्यात फसलेल्या 300 भारतीयांनी बंड केले हेत. यानंतर अनेक जणांना स्थानिक पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यातील सुमारे 150 जण एक वर्षापासून कंबोडियात अडकून पडले होते. चिनी हँडलर या भारतीयांकडून सायबर गुन्हे आणि पोंजी स्कीम करवित होता.
5 हजार भारतीय अडकल्याचा संशय
अनेक लोकांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आंध्र पोलिसांशी संपर्क साधत स्वत:ची पीडा व्यक्त केली आहे. सुमारे 5 हजार भारतीय कंबोडियात अडकून पडले असल्याची शक्यता आहे असे विशाखापट्टणमचे संयुक्त पोलीस आयुक्त फकीरप्पा कगिनेली यांनी म्हटले आहे. 2 महिन्यांपूर्वी देखील भारतीय दूतावासाने 250 भारतीय नागरिकांना वाचवत मायदेशी परत पाठविले होते. कंबोडियात या भारतीयांवर सायबर गुन्ह्यांसाठी बळजबरी केली जात होती. हे लोक कस्टम किंवा ईडी अधिकारी असल्याची बतावणी करून भारतात फोन करत होते. तुमच्यासाठी पाठविण्यात आलेलया पार्सलमध्ये संशयास्पद सामग्री असल्याचे आणि कारवाईपासून वाचायचे असल्यास पैसे पाठवा असे लोकांना ते सांगत होते
Home महत्वाची बातमी कंबोडियात 360 भारतीयांची गुन्हेगारांच्या तावडीतून मुक्तता
कंबोडियात 360 भारतीयांची गुन्हेगारांच्या तावडीतून मुक्तता
विदेशात नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक : सायबर गुन्ह्यांची केली जायची बळजबरी वृत्तसंस्था/ नामपेन्ह भारताने स्वत:च्या 360 नागरिकांना कंबोडियात गुन्हेगारांच्या तावडीतून मुक्तता करविली आहे. या भारतीयांना बनावट एजेन्सीने नोकरीचे आमिष दाखवून कंबोडिया येथे पाठविले होते. तेथे या भारतीयांकडून बळजबरीने सायबर फ्रॉड यासारखी कामे करविली जात होती. जिनबेई-4 नावाच्या या ठिकाणावरून त्यांना वाचविण्यात आले आहे. भारतीय दूतावासानुसार […]