त्रिपुरातील पुरात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू, केंद्रीय पथक आज पोहोचणार

आगरतळा : त्रिपुरामध्ये पुरामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, गृह मंत्रालयाचे सहसचिव बीसी जोशी यांच्या …

त्रिपुरातील पुरात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू, केंद्रीय पथक आज पोहोचणार

आगरतळा : त्रिपुरामध्ये पुरामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, गृह मंत्रालयाचे सहसचिव बीसी जोशी यांच्या नेतृत्वाखालील एक आंतर-मंत्रालयीन पथक बुधवारी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्यात पोहोचेल.

 

तसेच महसूल विभागाचे सचिव बिर्जेश पांडे यांनी सांगितले की, 72,000 लोक अजूनही 492 मदत छावण्यांमध्ये राहत आहे. कारण त्यांची घरे पुरात वाहून गेली आहेत. तर “19 ते 23 ऑगस्ट दरम्यान आलेल्या पुरात एकूण 31 लोकांचा मृत्यू झाला, तर दोन जण बेपत्ता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री साहा यांनी पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source