इन्फोसिसच्या नफ्यामध्ये 30 टक्के वाढ

मुंबई : इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील कंपनीने मागच्या तिमाहीत 30 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने 20 रुपये प्रति समभाग लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय 8 रुपये प्रति समभाग विशेष लाभांश देण्याचीही घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीमध्ये देशातील दुसऱ्या नंबरची मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने 7,969 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला […]

इन्फोसिसच्या नफ्यामध्ये 30 टक्के वाढ

मुंबई : इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील कंपनीने मागच्या तिमाहीत 30 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने 20 रुपये प्रति समभाग लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय 8 रुपये प्रति समभाग विशेष लाभांश देण्याचीही घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीमध्ये देशातील दुसऱ्या नंबरची मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने 7,969 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या तुलनेमध्ये नफा 30 टक्के अधिक आहे. वर्षाच्या आधी समान अवधीत कंपनीने 6,128 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. दुसरीकडे याच अवधीत 1.3 टक्के वाढीसह कंपनीने 37,923 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. पूर्ण आर्थिक वर्षामध्ये कंपनीने 26,233 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. याच्या मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये निव्वळ नफा 8.9 टक्के अधिक आहे.