शिंदे गटाच्या ३० पदाधिकाऱ्यांनी केला उबाठा शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार तथा लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत विलवडे येथील शिवसेना शिंदे गटाचे युवा पदाधिकारी सोनू दळवी यांनी जाहीर प्रवेश केला.खासदार राऊत यांनी त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश दिला . तळवडे येथे झालेल्या माजगाव, तळवडे […]

शिंदे गटाच्या ३० पदाधिकाऱ्यांनी केला उबाठा शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार तथा लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत विलवडे येथील शिवसेना शिंदे गटाचे युवा पदाधिकारी सोनू दळवी यांनी जाहीर प्रवेश केला.खासदार राऊत यांनी त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश दिला . तळवडे येथे झालेल्या माजगाव, तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाच्या जाहिर सभेनंतर हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.यावेळी जितेंद्र दळवी, विश्राम दळवी ,दत्ताराम दळवी ,प्रतीक दळवी ,शांताराम दळवी, अमित दळवी, सागर दळवी, गौरव देऊळकर, सुनील देऊळकर ,स्वप्निल दळवी, साहिल दळवी, लक्ष्मण दळवी ,उदय देऊळकर ,बुधाजी कानडे ,अनिल सावंत ,जयराम गावडे गोविंद सावंत ,अनिल सावंत, गोविंद सावंत, अनिल मेस्त्री ,गोविंद दळवी यांनी जाहीर प्रवेश केला . प्रवेशकर्त्यांमध्ये नंदू परब ,सुजल परब ,अशोक परब, शैलेश परब, लक्ष्मण गवस ,संकेत गवस ,अनिल गवस ,दिगंबर गवस ,सुभाष गवस ,तानाजी गवस ,दीपक गवस ,मिलिंद गवस ,राजन गवस ,या 30 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, अॅड दिलीप नार्वेकर, विकास सावंत, संजय पडते, जान्हवी सावंत, साक्षी वंजारी कौस्तूभ गावडे, महेंद्र सांगलेकर, रविंद्र म्हापसेकर, शब्बीर मणियार, रश्मी माळवदे, बाळा गावडे, शैलेश परब, रुपेश राऊळ, समिर वंजारी हिमांशू परब आदी उपस्थित होते.