म्हैसूर मधील 3 प्रेक्षणीय स्थळे

भारताला पर्यटनाचा विशेष वारसा लाभलेला आहे. तसेच आज आपण भारतातील म्हैसूर मधील तीन प्रेक्षणीय स्थळे पाहणार आहोत. सांस्कृतिक महत्त्व, ऐतिहासिक भव्यता आणि प्राचीन वारसा यासाठी प्रसिद्ध असलेले म्हैसूर शहर हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. तसेच येथे असलेली …

म्हैसूर मधील 3 प्रेक्षणीय स्थळे

भारताला पर्यटनाचा विशेष वारसा लाभलेला आहे. तसेच आज आपण भारतातील म्हैसूर मधील तीन प्रेक्षणीय स्थळे पाहणार आहोत. सांस्कृतिक महत्त्व, ऐतिहासिक भव्यता आणि प्राचीन वारसा यासाठी प्रसिद्ध असलेले म्हैसूर शहर हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. तसेच येथे असलेली निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. म्हैसूर हे भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ज्याला “पॅलेस सिटी” किंवा “सिटी ऑफ पॅलेस” म्हणून देखील ओळखले जाते.  

 

निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी आणि इतिहास, कलाप्रेमी पर्यटकांसाठी येथे पाहण्यासारखी अद्भुत ठिकाणे आहे. जर तुम्हाला फिरायला जायचे असेल तर नक्कीच म्हैसूरमधील या 3 प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्या.

 

म्हैसूर पॅलेस-

म्हैसूर शहरातील आलिशान आणि सुंदर राजवाड्यांसाठी प्रसिद्ध असलेले म्हैसूर पॅलेस हा खूप अद्भुत आहे. समृद्ध इतिहास आणि सुंदर स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध, म्हैसूर पॅलेस हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इंडो-सारासेनिक आर्किटेक्चरमध्ये बांधलेले, म्हैसूर पॅलेसचे कोरीव दरवाजे, रत्नजडित सोन्याचे सिंहासन, पेंटिंग्ज आणि सोनेरी हुड राजवाड्याची भव्यता दर्शवतात. हा प्राचीन राजवाडा व त्याची भव्यता आणि सांस्कृतिक महत्त्व आणि स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे.

 

रेल्वे संग्रहालय-

म्हैसूर आणि कर्नाटकच्या मध्यभागी 1979 साली भारतीय रेल्वेने स्थापन केलेले रेल्वे संग्रहालय हे एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात रुची असलेल्या पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. राजधानी दिल्लीत बांधण्यात आलेले राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयानंतरचे हे दुसरे रेल्वे संग्रहालय असून जे पर्यटकांना ट्रेनच्या उत्क्रांती आणि भारतीय रेल्वेच्या विकासाची झलक देते. भारतीय रेल्वेचे ऐतिहासिक महत्त्व जपल्यामुळे हे प्रसिद्ध संग्रहालय शैक्षणिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते.

 

वृंदावन गार्डन-

म्हैसूर शहरापासून 19 किमी अंतरावर असलेल्या वृंदावन गार्डनला “पर्यटकांचे नंदनवन” मानले जाते. तसेच हे अतिशय सुंदर उद्यान कावेरी नदीवर बांधलेल्या कृष्णराजसागर धरणाला लागून आहे. वृंदावन गार्डन, टेरेस्ड गार्डन्स आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या हिरवळीसाठी प्रसिद्ध लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.या प्रसिद्ध पर्यटन स्थळाची रचना काश्मीरमधील मुघल शैलीतील शालीमार उद्यानांसारखी दिसते. तसेच वृंदावन गार्डन हे म्हैसूरचे सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे.