ओडिसामध्ये सर्पदंशामुळे 3 सख्ख्या बहिणींचा मृत्यू, वडिलांची प्रकृती चिंताजनक

ओडिशामधील बौध जिल्ह्यात रविवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जणांना साप चावला. व या सर्पदंशामुळे तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. तर या मुलींच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, टिकरपाडा …

ओडिसामध्ये सर्पदंशामुळे 3 सख्ख्या बहिणींचा मृत्यू, वडिलांची प्रकृती चिंताजनक

ओडिशामधील बौध जिल्ह्यात रविवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जणांना साप चावला. व या सर्पदंशामुळे तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. तर या मुलींच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, टिकरपाडा पंचायत क्षेत्रातील चरियापाली गावात रविवारी रात्री ही घटना घडली आहे.  

 

चारियापली गावातील रहिवासी सुरेंद्र मलिक हे कुटुंबासह झोपले होते. त्यानंतर रात्री त्यांच्या मुलींची तब्येत बिघडू लागल्याने संपूर्ण कुटुंब जागे झाले. मुलींना श्वास घेण्यास त्रास होत होता. जवळच एक साप रेंगाळत असल्याचे सुरेंद्रने पाहिले. त्यांनी पत्नीला मदतीसाठी बोलावले. तत्काळ चौघांनाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण तिन्ही मुलींना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. तसेच या तिघही बहिणींचे वडील सुरेंद्र मलिक यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Go to Source