48 लाख कर्मचारी आणि 67 लाख पेन्शनधारकांना 3 टक्के महागाई भत्ता जाहीर

केंद्र सरकारमधील एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता ‘DA’ आणि महागाई मदत ‘DR’ मध्ये तीन टक्के वाढीची भेट मिळाली आहे. डीए/डीआर दर सामान्यतः सप्टेंबर महिन्यात घोषित केले जातात.

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने डीएच्या दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 1 जुलैपासून देय असलेल्या महागाई भत्त्याचा दर आता 50 टक्क्यांवरून 53टक्के झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

किती फायदा होणार –

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18 हजार रुपये असेल तर 53 टक्के महागाई भत्त्यानुसार त्याच्या पगारात दरमहा सुमारे 540 रुपयांची वाढ होईल.

कर्मचाऱ्याचा मूळ पगार 25हजार रुपये असेल तर त्याला दरमहा 750 रुपयांचा लाभ मिळेल. 

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 35 हजार रुपये असेल तर त्याला दरमहा 1050 रुपये अधिक मिळतील. 

45 हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याच्या पगारात अंदाजे 1350 रुपयांची वाढ होणार आहे. 

52 हजार रुपये मूळ वेतन मिळवणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना डीए वाढीवर दरमहा 1560 रुपयांचा लाभ मिळेल.

70 हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला अंदाजे 2100 रुपयांचा लाभ मिळेल. 

85,500 रुपयांच्या मूळ वेतनावर अंदाजे 2565 रुपयांची वाढ होणार आहे. 

1 लाख रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात दरमहा 3000 रुपयांनी वाढ होणार आहे.

Edited By – Priya Dixit

Go to Source