तोयबा’च्या 3 हस्तकांना काश्मीरमध्ये अटक

वृत्तसंस्था /श्रीनगर जम्मू-काश्मीर पोलिसांनी बारामुल्ला जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या तीन हस्तकांना अटक केली आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित काही दहशतवादी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने बारामुल्ला शहरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर संबंधितांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुऊवारी दिली. ओवेस अहमद वाजा, बासित फयाज कालू आणि फहीम अहमद मीर अशी तिघांची नावे आहेत. हे तीन तऊण दहशतवाद्यांना सुरक्षा […]

तोयबा’च्या 3 हस्तकांना काश्मीरमध्ये अटक

वृत्तसंस्था /श्रीनगर
जम्मू-काश्मीर पोलिसांनी बारामुल्ला जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या तीन हस्तकांना अटक केली आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित काही दहशतवादी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने बारामुल्ला शहरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर संबंधितांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुऊवारी दिली. ओवेस अहमद वाजा, बासित फयाज कालू आणि फहीम अहमद मीर अशी तिघांची नावे आहेत. हे तीन तऊण दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या कारवायांची माहिती देत असत. त्यांच्याकडून तीन हातबॉम्बही जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कसून चौकशी सुरू असल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले.