कोगनोळी नाक्यावर 3.96 लाख हस्तगत

निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई वार्ताहर /कोगनोळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असलेल्या कोगनोळी (ता. निपाणी) येथील तपास नाक्यावर सोमवारी रात्री 3 लाख 96 हजार 770 रुपये निवडणूक विभागाने जप्त केले. कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाक्याची उभारणी करण्यात आली आहे. 18 रोजी रात्री 7 वाजता कागल येथील रहिवाशी महेश गाडेकर हे आपली कार […]

कोगनोळी नाक्यावर 3.96 लाख हस्तगत

निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई
वार्ताहर /कोगनोळी
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असलेल्या कोगनोळी (ता. निपाणी) येथील तपास नाक्यावर सोमवारी रात्री 3 लाख 96 हजार 770 रुपये निवडणूक विभागाने जप्त केले. कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाक्याची उभारणी करण्यात आली आहे. 18 रोजी रात्री 7 वाजता कागल येथील रहिवाशी महेश गाडेकर हे आपली कार क्रमांक एमएच 09 जेएन 8384 मधून जात होते. यावेळी तपास नाक्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारची तपासणी केली असता गाडेकर यांच्याकडे 2 लाख 56 हजार 770 रुपये आढळून आले. त्याच दिवशी रात्री 8 वाजता कार क्रमांक एमएच 09 जेएल 2224 यामधून 1 लाख 40 हजार रुपये जप्त करण्यात आले. दशरथ कुट्रे हे कारमधून कोल्हापूरहून केंचेवाडीला जात होते. नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये 1 लाख 40 हजार रुपये आढळून आले. गाडेकर व कुट्रे यांना रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे देता न आल्यामुळे सीमा तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त करुन निवडणूक विभागाकडे सादर केली. या कारवाईमुळे व्यावसायिकांसह वाहनधारक धास्तावले आहेत. यावेळी निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, संजय काडगौडर, शिवप्रसाद कडकन्नावर यांच्यासह महसूल विभाग व ग्राम पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.