अखेर 29 गावं वसई-विरार महापालिकेत समाविष्ट
राज्य सरकारने वसई विरार महापालिकेत (VVMC) 29 गावे (villages) कायम ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याबाबत राज्य सरकारकडून (state government) तब्बल 31 हजार हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्यात गावे वगळण्याबाबात 19 हजार गावे वगळू नये यासाठी 11 हजार हरकती आल्या आहेत. या सर्व हरकती आणि सूचनांवर 16 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.2011 साली वसई विरार (virar) महापालिकेतून 29 गावे वगळण्यात आली होती. शासनाच्या या निर्णयाला वसई विरार महाालिकेने स्थगिती दिली होती. तेव्हापासून सुमारे 13 वर्ष गावे वगळण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित होते. मात्र 14 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने गावे वगळण्याचा 2011 चा निर्णय रद्द केला. तसेच गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करत असल्याचा नवीन आदेश जाहीर केला. गावांचा कायमस्वरूपी महापालिकेत समावेश करण्यात आल्याने या संदर्भातील हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या.गावांचा महापालिकेत (VVMC) समावेश केल्यांतर 14 फेब्रुवारी 2024 ते 14 मार्च 2024 पर्यंत 31 हजार 389 हरकती आणि सूचना देण्यात आल्या होत्या.तसेच गावे महापालिकेतून वगळू नयेत यासाठी 11 हजार 591 अर्ज (application) प्राप्त झाले. तसेच वगळण्यात यावीत यासाठी 19 हजार 798 अर्ज प्राप्त झाले होते. या हरकती आणि सूचनांवर आता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी 16 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत घेतली जाणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे सुनावणी लांबणीवर पडली होती.हरकती आणि सुचनांच्या सुनावणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुकास्तरीय तहसिलदारांच्या पथकात तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक अर्जदारांना नोटीसचे वाटप करण्याचे तसेच सुनावणी पथकाला मदत करण्याचे काम करणार आहे. वसई विरार महापालिकेकडून 15 पथक नियुक्त करण्यात येणार आहेत. अर्जाची छाननी करणे, सुनावणी नोटीस बजावणे आणि अंतिम अहवाल तयार करण्याची जबाबदारी या पथकावर असणार आहे. 30 डिसेंबर 2024 पर्यत सुनावणी घेऊन निर्णय दिला जाणार आहे.हेही वाचाधारावी रहिवाशांची आरोग्य विम्यासाठी नोंदणीमुंबईत 2 वर्षात उभारण्यात येणार बर्ड पार्क
Home महत्वाची बातमी अखेर 29 गावं वसई-विरार महापालिकेत समाविष्ट
अखेर 29 गावं वसई-विरार महापालिकेत समाविष्ट
राज्य सरकारने वसई विरार महापालिकेत (VVMC) 29 गावे (villages) कायम ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याबाबत राज्य सरकारकडून (state government) तब्बल 31 हजार हरकती आणि सूचना आल्या आहेत.
त्यात गावे वगळण्याबाबात 19 हजार गावे वगळू नये यासाठी 11 हजार हरकती आल्या आहेत. या सर्व हरकती आणि सूचनांवर 16 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.2011 साली वसई विरार (virar) महापालिकेतून 29 गावे वगळण्यात आली होती. शासनाच्या या निर्णयाला वसई विरार महाालिकेने स्थगिती दिली होती. तेव्हापासून सुमारे 13 वर्ष गावे वगळण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित होते.
मात्र 14 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने गावे वगळण्याचा 2011 चा निर्णय रद्द केला. तसेच गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करत असल्याचा नवीन आदेश जाहीर केला. गावांचा कायमस्वरूपी महापालिकेत समावेश करण्यात आल्याने या संदर्भातील हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या.
गावांचा महापालिकेत (VVMC) समावेश केल्यांतर 14 फेब्रुवारी 2024 ते 14 मार्च 2024 पर्यंत 31 हजार 389 हरकती आणि सूचना देण्यात आल्या होत्या.
तसेच गावे महापालिकेतून वगळू नयेत यासाठी 11 हजार 591 अर्ज (application) प्राप्त झाले. तसेच वगळण्यात यावीत यासाठी 19 हजार 798 अर्ज प्राप्त झाले होते. या हरकती आणि सूचनांवर आता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी 16 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत घेतली जाणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे सुनावणी लांबणीवर पडली होती.
हरकती आणि सुचनांच्या सुनावणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुकास्तरीय तहसिलदारांच्या पथकात तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे पथक अर्जदारांना नोटीसचे वाटप करण्याचे तसेच सुनावणी पथकाला मदत करण्याचे काम करणार आहे. वसई विरार महापालिकेकडून 15 पथक नियुक्त करण्यात येणार आहेत.
अर्जाची छाननी करणे, सुनावणी नोटीस बजावणे आणि अंतिम अहवाल तयार करण्याची जबाबदारी या पथकावर असणार आहे. 30 डिसेंबर 2024 पर्यत सुनावणी घेऊन निर्णय दिला जाणार आहे.हेही वाचा
धारावी रहिवाशांची आरोग्य विम्यासाठी नोंदणी
मुंबईत 2 वर्षात उभारण्यात येणार बर्ड पार्क