डिसेंबर महिन्यात 264 वाहन अपघात

19 जणांचा मृत्यू, 3 8 गंभीर जखमी : नियमांचे उल्लंघन हेच अपघात होण्याचे प्रमुख कारण  पणजी : राज्यात डिसेंबर या एकाच महिन्यात तब्बल 264 वाहन अपघात झाले असून त्यांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबरमध्ये पर्यटकांचीही गर्दी वाढत असते. स्थानिक तसेच पर्यटकांपैकीही बरेचजण मिळेल, तशा पध्दतीने दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवत असतात आणि त्यामुळे अपघातांना […]

डिसेंबर महिन्यात 264 वाहन अपघात

19 जणांचा मृत्यू, 3 8 गंभीर जखमी : नियमांचे उल्लंघन हेच अपघात होण्याचे प्रमुख कारण 
पणजी : राज्यात डिसेंबर या एकाच महिन्यात तब्बल 264 वाहन अपघात झाले असून त्यांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबरमध्ये पर्यटकांचीही गर्दी वाढत असते. स्थानिक तसेच पर्यटकांपैकीही बरेचजण मिळेल, तशा पध्दतीने दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवत असतात आणि त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असते. एकूण 264 अपघातात 17 अपघातांमध्ये मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. 38 अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. 60 अपघातात कमी दुखापती झाल्या आहेत. 149 अपघातात कुणालाही दुखापत झाली, नाही मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे. एकूण 19 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण गंभीर जखमी झाले आहेत.
बेशिस्तपणा अपघातांचे मुख्य कारण
बेशिस्तपणे वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविणे आणि नियमांचे उल्लंघन करणे हेच अपघात होण्याचे प्रमुख कारण आहे. मद्यपान करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, यामुळेही बरेच अपघात झालेले आहेत. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू झाल्याचेही प्रकार घडले आहेत. हे सगळे घडत असताना विविध माध्यमांतून याबाबतच्या बातम्य प्रसिध्द होत असतानाही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात आणि अपघातांना निमंत्रण देतात. राज्यात डिसेंबर महिना हा पार्ट्यांचा महिना असतो. देशविदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. ओल्ड गोवा फेस्त, नाताळ आणि नंतर नव्या वर्षाच्या स्वगतासाठी बऱ्याच प्रमाणात पर्यटक येत असतात. जवळजवळ सर्वच रस्ते वाहनांनी भरलेले असतात.