मुंबईत टेम्पो ऑटोरिक्षाच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबईत बोरिवली परिसरात हिट अँड रन ची घटना घडली आहे. या अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुनील विश्वकर्मा असे या मयत तरुणाचे नाव आहे. मयत नालासोपारा पूर्वचा रहिवासी होता. अपघातांनंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरमायन त्याचा …

मुंबईत टेम्पो ऑटोरिक्षाच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबईत बोरिवली परिसरात हिट अँड रन ची घटना घडली आहे. या अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुनील विश्वकर्मा असे या मयत तरुणाचे नाव आहे. मयत नालासोपारा पूर्वचा रहिवासी होता. अपघातांनंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरमायन त्याचा मृत्यू झाला. 

ALSO READ: मुंबईतील व्यावसायिकाची ११.५ लाख रुपयांची फसवणूक, ४ जणांना अटक
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एक भरधाव वेगाने धावणाऱ्या टेम्पोने तरुण प्रवास करत असलेल्या ऑटोरिक्षाला धडक दिली आणि अपघात झाला. या अपघातानंतर टेम्पो चालक पळून गेला.  

पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी टेम्पो चालकाला शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. 

ALSO READ: नवी मुंबईत परीक्षा हॉलमध्ये अकरावीच्या विद्यार्थिनींचा विनयभंग, पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल
मयत सुनील विश्वकर्मा आपल्या वडिलांना घेऊन कामानिमित्त बोरिवली न्यू लिंक रोडवरील योगी नगर गेले होते. काम आटपवून ते रात्री 9 वाजता घरी परत येण्यासाठी शेअरिंग ऑटोरिक्षात बसले. काही अंतरावर गेल्यावर एक भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो चालकाने रिक्षाच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे सुनीलच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असता त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला.

ALSO READ: मुंबई: सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून वृद्ध महिलेची फसवणूक
अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरुन पळून गेला. सुनीलच्या वडिलांनी अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. टेम्पो चालकावर पोलिसांनी बीएनएसच्या कलम134(अ), 134(ब), 184, 106, 125(अ), 125(ब) आणि 281 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited By – Priya Dixit  

 

 

Go to Source