जिल्ह्यातील 25 पूल पाण्याखालीतवंदी घाटातील ब्लास्टिंगही थांबविल

बेळगाव : जिल्ह्यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांवरील पुलांवर पाणी आले आहे. त्यामुळे पोलीस खात्याकडून विशेष दखल घेण्यात आली आहे. धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 83 पुलांपैकी 25 पूल पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित […]

जिल्ह्यातील 25 पूल पाण्याखालीतवंदी घाटातील ब्लास्टिंगही थांबविल

बेळगाव : जिल्ह्यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांवरील पुलांवर पाणी आले आहे. त्यामुळे पोलीस खात्याकडून विशेष दखल घेण्यात आली आहे. धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 83 पुलांपैकी 25 पूल पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्ह्यातील निपाणी, कागवाड, चिकोडी, खानापूर आदी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. अशा ठिकाणी बॅरिकेड्स लावून धोका असल्याचे नागरिकांना सांगण्यात येत आहे. ठिकठिकाणी पोलीस व होमगार्डची नियुक्ती करून पाण्यातून जाण्यासाठी नागरिकांना रोखण्यात येत आहे. कोणत्याच प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. पूरस्थिती निर्माण होणाऱ्या गावांमध्ये पोलीस खात्यातर्फे बैठका घेऊन जागृती करण्यात आली आहे. बारवाड येथे सहा घरांमध्ये पाणी शिरल्याने सदर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाण्याचा वेग अधिक असतो. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण पाण्यात जाऊन जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही त्यांनी केले. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ पथकाची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने आवश्यक असणारी साधनसामग्री पुरविली आहे. लाईफ जॅकेट, बोट यांची सोय करण्यात आली आहे.
पावसाळा सुरू असल्याने वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. पर्यटनस्थळांवर सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. गोकाक धबधब्याच्या परिसरात सेल्फी काढण्यासाठी प्रवाशांकडून हुल्लडबाजी केली जात आहे. यासाठी होमगार्ड व पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रवास उद्यम खात्याची मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तवंदी घाटामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून डोंगर फोडण्यासाठी ब्लास्टिंग केले जात आहे. यामुळे भूस्खलन होण्याची दाट शक्यता आहे. सदर काम थांबविण्याची सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.