हिंदुस्थान युनिलिव्हरला 2406 कोटी रुपयांचा नफा

नवी दिल्ली : एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने मार्च अखेरच्या चौथ्या तिमाहीमध्ये 2406 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये सहा टक्के इतकी घसरण दिसून आली आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीने 2552 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीने 14,693 कोटी […]

हिंदुस्थान युनिलिव्हरला 2406 कोटी रुपयांचा नफा

नवी दिल्ली : एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने मार्च अखेरच्या चौथ्या तिमाहीमध्ये 2406 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये सहा टक्के इतकी घसरण दिसून आली आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीने 2552 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीने 14,693 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीत 14,638 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. कंपनीने याच दरम्यान 24 रुपयांचा लाभांश देण्याचे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अंतिम केले आहे.