आचारसंहितेदरम्यान मुंबई पोलिसांनी 2.3 कोटी रुपये केले जप्त, 12 जणांना अटक

Mumbai news : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी, पोलिसांनी दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथे 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण …

आचारसंहितेदरम्यान मुंबई पोलिसांनी 2.3 कोटी रुपये केले जप्त, 12 जणांना अटक

Mumbai news : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी, पोलिसांनी दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथे 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथे पोलिसांनी 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या संदर्भात शुक्रवारी पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याचे पथक आणि निवडणूक अधिकारींनी गुरुवारी रात्री काही जणांना रोखले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2.3 कोटी रुपयांची रोकड सापडली. पैसे घेऊन जाणारे हे लोक रोख रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत किंवा एवढी मोठी रक्कम घेऊन जाण्याचे कारणही सांगू शकले नाहीत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत झालेल्या कागदोपत्री चौकशीनंतर ही रक्कम जप्त करण्यात आली असून रोकड घेऊन जाणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नंतर ही रोकड तपासासाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source