दिल्ली महिला आयोगाचे 223 कर्मचारी बडतर्फ

नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचा आदेश वृत्तसंस्था /नवी दिल्ली दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिल्ली महिला आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी महिला आयोगाच्या सुमारे 223 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. आदेशानुसार दिल्ली महिला आयोगाने आपल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने काढून टाकले आहे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा आदेश जारी झाल्याने खळबळ […]

दिल्ली महिला आयोगाचे 223 कर्मचारी बडतर्फ

नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचा आदेश
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिल्ली महिला आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी महिला आयोगाच्या सुमारे 223 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. आदेशानुसार दिल्ली महिला आयोगाने आपल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने काढून टाकले आहे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा आदेश जारी झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केली होती. नायब राज्यपालांच्या परवानगीशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांच्यावर आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दिल्ली महिला आयोगाच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा आदेश आला आहे. तपास अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
नियम डावलून कर्मचाऱ्यांची भरती
दिल्लीचे एलजी विनय कुमार सक्सेना यांनी 223 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वाती मालीवाल यांच्या कार्यकाळात कामावर घेण्यात आले होते. स्वाती मालीवाल यांनी नियम डावलून या सर्व कर्मचाऱ्यांची भरती केल्याचा आरोप आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी 5 जानेवारी 2024 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आम आदमी पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन राज्यसभेवर पाठवले होते.