बेस्टच्या 2160 बस भंगारात

कुर्ला (kurla) येथे बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता बेस्टच्या मालकीच्या वाहनांमध्ये प्रचंड घट झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या पाच वर्षांत बेस्टने आयुर्मान संपुष्टात आलेल्या तब्बल 2160 बस भंगारात (scrap) काढल्या आहेत. त्याबदल्यात केवळ बेस्टने (best) 37 नवीन बसगाड्या घेतल्या आहेत. बेस्टच्या मालकीच्या केवळ 1061 बस ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यान्वित होत्या, असे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उपलब्ध माहितीतून स्पष्ट झाले आहे.मुंबईची (mumbai) लोकसंख्या सतत वाढत असताना बेस्ट बसची ही परिस्थिती चिंताजनक आहे. बेस्टने 2,126 बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.  मागील काही आठवड्यात बस थांब्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बेस्ट (BEST) उपक्रमातील स्वमालकीचा ताफा हळूहळू कमी झाला आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसची संख्या वाढत आहे. भाडेतत्त्वावरील बसचे कर्मचारी यामुळे कमी पगारात काम करतात. तसेच या बसची देखभाल तसेच दुरुस्ती होत नसल्याने प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बेस्ट बसचा स्वमालकीचा ताफा कमी होत असल्याने अनेक बस मार्ग बंद झाले आहेत. भाडेतत्वावरील अनेक बसगाड्यांची दुरूस्तीच होत नसल्याने वातानुकूलित यंत्रणा अधूनमधून बंद पडत आहे. यामुळे अचानक बस ब्रेक डाऊन होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या 1061 बस आहेत तसेच उर्वरित बसेस भाडेतत्त्वावरील आहेत. बेस्ट उपक्रमातील खासगी बस पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांकडे कंत्राटी पद्धतीने चालक, वाहक आणि इतर कर्मचारी काम करत आहेत. परंतु, अवेळी वेतन मिळण्यास विलंब, वेतनवाढ न होणे, साप्ताहिक सुट्टीव्यतिरिक्त अन्य सुट्ट्या नसणे आदी प्रश्नांमुळे हे कर्मचारी त्रस्त आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च, कुटुंबियांचा आरोग्य खर्च व महत्त्वाच्या गरजा पूर्ण होत नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी अधूनमधून आंदोलन करीत आहेत. अनेक कर्मचारी विश्रांंती न घेता अतिरिक्त काम करीत असल्याने त्याचा थेट परिणाम कामावर होत आहे. त्यामुळे बस अपघातात वाढ होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कमी झालेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च, तसेच दैनंदिन खर्च भागवताना करावी लागणारी तारेवरची कसरत आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यासाठी करावी लागणारी धावपळ अशी विचित्र अवस्था बेस्टची झाली आहे.हेही वाचा पालिका खार दांडा येथे सीफूड प्लाझा सुरू करणार कचरा टाकणाऱ्यांवर क्लीन अप मार्शलची कारवाई

बेस्टच्या 2160 बस भंगारात

कुर्ला (kurla) येथे बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता बेस्टच्या मालकीच्या वाहनांमध्ये प्रचंड घट झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या पाच वर्षांत बेस्टने आयुर्मान संपुष्टात आलेल्या तब्बल 2160 बस भंगारात (scrap) काढल्या आहेत. त्याबदल्यात केवळ बेस्टने (best) 37 नवीन बसगाड्या घेतल्या आहेत. बेस्टच्या मालकीच्या केवळ 1061 बस ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यान्वित होत्या, असे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उपलब्ध माहितीतून स्पष्ट झाले आहे.मुंबईची (mumbai) लोकसंख्या सतत वाढत असताना बेस्ट बसची ही परिस्थिती चिंताजनक आहे. बेस्टने 2,126 बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.  मागील काही आठवड्यात बस थांब्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बेस्ट (BEST) उपक्रमातील स्वमालकीचा ताफा हळूहळू कमी झाला आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसची संख्या वाढत आहे. भाडेतत्त्वावरील बसचे कर्मचारी यामुळे कमी पगारात काम करतात. तसेच या बसची देखभाल तसेच दुरुस्ती होत नसल्याने प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बेस्ट बसचा स्वमालकीचा ताफा कमी होत असल्याने अनेक बस मार्ग बंद झाले आहेत. भाडेतत्वावरील अनेक बसगाड्यांची दुरूस्तीच होत नसल्याने वातानुकूलित यंत्रणा अधूनमधून बंद पडत आहे. यामुळे अचानक बस ब्रेक डाऊन होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या 1061 बस आहेत तसेच उर्वरित बसेस भाडेतत्त्वावरील आहेत. बेस्ट उपक्रमातील खासगी बस पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांकडे कंत्राटी पद्धतीने चालक, वाहक आणि इतर कर्मचारी काम करत आहेत. परंतु, अवेळी वेतन मिळण्यास विलंब, वेतनवाढ न होणे, साप्ताहिक सुट्टीव्यतिरिक्त अन्य सुट्ट्या नसणे आदी प्रश्नांमुळे हे कर्मचारी त्रस्त आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च, कुटुंबियांचा आरोग्य खर्च व महत्त्वाच्या गरजा पूर्ण होत नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी अधूनमधून आंदोलन करीत आहेत. अनेक कर्मचारी विश्रांंती न घेता अतिरिक्त काम करीत असल्याने त्याचा थेट परिणाम कामावर होत आहे. त्यामुळे बस अपघातात वाढ होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कमी झालेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च, तसेच दैनंदिन खर्च भागवताना करावी लागणारी तारेवरची कसरत आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यासाठी करावी लागणारी धावपळ अशी विचित्र अवस्था बेस्टची झाली आहे.हेही वाचापालिका खार दांडा येथे सीफूड प्लाझा सुरू करणारकचरा टाकणाऱ्यांवर क्लीन अप मार्शलची कारवाई

Go to Source