2024 ड्युरॅन्ड चषक फुटबॉल कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली : इंडियन ऑईल पुरस्कृत 133 व्या ‘ड्यूरॅन्ड चषक’ फुटबॉल स्पर्धा कार्यक्रम येथे घोषित करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ सहा गटात विभागण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील विद्यमान विजेते मोहन बागान, सुपर जायंट, इस्ट बंगाल एफसी यांचा एकाच गटात समावेश आहे. 133 व्या ड्युरॅन्ड चषक फुटबॉल स्पर्धेला 27 जुलैपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी होणार आहेत. ड्यूरॅन्ड चषक 2024 च्या फुटबॉल स्पर्धेतील सामने जमशेदपूर, शिलाँग, कोलकत्ता शहरामध्ये होतील.
गट अ:- मोहन बागान, इस्ट बंगाल, इंडियन एअर फोर्स
गट ब:- बेंगळूर एफसी, इंटर काशी एफसी, इंडियन नेव्ही
गट क:- केरळ ब्लास्टर्स, मुंबई सिटी, पंजाब एफसी, सीआयएसएफ प्रोटेक्टर्स
गट ड:- जमशेदपूर एफसी, चेन्नीयन एफसी, भारतीय सेनादल
गट इ:-ओडीशा एफसी, नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी, बोडोलॅन्ड, बीएसएफ
गट फ:- एफसी गोवा, हैद्राबाद, लेजाँग-शिलाँग, त्रिभुवन आर्मी.