एआयच्या मदतीने 2 हजार वर्षे जुन्या रहस्याची उकल
जगाच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या प्रयत्नात पुरातत्व विभागाला अशा अनेक गोष्टी प्राप्त होत असतात, ज्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी खोल जमिनीत अज्ञात भाषेत हजारो वर्षे जुने दस्तऐवज-शिलालेख मिळाले आहेत. यावरील भाषा अज्ञात असल्याने त्यावर नेमका कोणता उल्लेख आहे हे समजून घेणे अवघड आहे. परंतु अलिकडेच अशाच एका 2 हजार वर्षे जुन्या टेक्स्टला डीकोड करण्यात आले आहे.
79 साली माउंट वेसुवियसच्या विस्फोटात दफन होण्यादरम्यान आंशिक स्वरुपात संरक्षित करण्यात आलेल्या एका रोमन स्क्रॉलला आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर करून डीकोड करण्यात आले आहे. अमेरिका, स्वीत्झर्लंड आणि इजिप्तच्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारे सुवियस विस्फोटादरम्यान जळालेल्या एका प्राचीन रोमन स्क्रॉलच्या हिस्स्याला डीकोड करून दाखविले आहे. मार्च 2023 मध्ये सुवियस चॅलेंजच्या हिस्स्याच्या स्वरुपात याला लाँच करण्यात आले होते. ज्वालामुखीच्या विस्फोटाच्या राखेत गमावलेल्या प्राचीन लिपींना डिकोड करणाऱ्या टीमला 5.8 कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
विजेता टीमने 2000 वर्षे जुना स्क्रोलला डीकोड केले आहे. याच्या टेक्स्टमध्ये म्युझिक आणि खाण्यावरील एपिकुरियन फिलोस्कीचा उल्लेख होता. वेसुवियस चॅलेंज जिंकणाऱ्या सबमिशन टीमचे प्रमुख युसूफ नादेर यांनी हे ऐतिहासिक पुरावशेषांच्या एका विशाल भांडाराचे प्रतिनिधित्व करत असल्याचे म्हटले आहे. जर आम्ही या सर्व प्राचीन गोष्टींना रिकव्हर करू शकलो तर हे प्राचीन इक्विटीमधून प्राप्त इतिहासाच्या प्रमाणाला जवळपास दुप्पट करतील असे त्यांचे सांगणे आहे.
प्राचीन रोमन स्क्रॉल नाजुक स्थितीत असला तरीही येथे एआय उपयुक्त ठरले आहे. एआय प्रोग्रामला पृष्ठभाग आणि छिपी दोन्ही आच्छादनांवरील शाई वाचण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्यात आले आहे. तिन्ही विद्यार्थ्यांनी टेक्स्टच्या 15 हून अधिक कॉलम्सना डीकोड केले असून हे प्रमाण एका स्क्रॉलच्या जवळपास 5 टक्के आहे.
अखेरीस आमच्याकडे असे मॉडेल असावे जे कुठल्याही प्रकारच्या स्क्रॉलवर काम करत असेल, भले मग ते कुठल्याही सिथतीत असो असे उद्गार नाडेर यांनी काढले आहेत. वेसुवियस चॅलेंज यंदा एका नव्या भव्य पुरस्कारासोबत जारी आहे. यात एआयचा वापर करून उर्वरित स्क्रॉल वाचण्याचे आव्हान आहे. तर ज्या स्क्रॉलला केवळ आंशिक स्वरुपात डिकोड करण्यात आले होते ते शेकडोंपैकी एक आहे.
Home महत्वाची बातमी एआयच्या मदतीने 2 हजार वर्षे जुन्या रहस्याची उकल
एआयच्या मदतीने 2 हजार वर्षे जुन्या रहस्याची उकल
जगाच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या प्रयत्नात पुरातत्व विभागाला अशा अनेक गोष्टी प्राप्त होत असतात, ज्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी खोल जमिनीत अज्ञात भाषेत हजारो वर्षे जुने दस्तऐवज-शिलालेख मिळाले आहेत. यावरील भाषा अज्ञात असल्याने त्यावर नेमका कोणता उल्लेख आहे हे समजून घेणे अवघड आहे. परंतु अलिकडेच अशाच एका 2 हजार वर्षे जुन्या […]