जमिनीत सापडला 2 हजार वर्षे जुना धातूचा हात

अनेक रहस्यांची झाली उकल जगातील अनेक देश स्वत:च्या भूमीत असलेल्या प्राचीन स्थळांवर उत्खनन करत असतात. यामुळे प्राचीन संस्कृती आणि इतिहासाविषयी जाणून घेण्याची संधी मिळते. उत्खननात प्राप्त सामग्रीतून त्या काळातील लोक कसे राहत होते हे कळत असते. स्पेनमध्ये असाच प्रकार घडला आहे. येथे जमिनीखाली पितळेचा हात सापडला आहे. हा धातूचा हात 2 हजार वर्षे जुना असल्याचे […]

जमिनीत सापडला 2 हजार वर्षे जुना धातूचा हात

अनेक रहस्यांची झाली उकल
जगातील अनेक देश स्वत:च्या भूमीत असलेल्या प्राचीन स्थळांवर उत्खनन करत असतात. यामुळे प्राचीन संस्कृती आणि इतिहासाविषयी जाणून घेण्याची संधी मिळते. उत्खननात प्राप्त सामग्रीतून त्या काळातील लोक कसे राहत होते हे कळत असते. स्पेनमध्ये असाच प्रकार घडला आहे. येथे जमिनीखाली पितळेचा हात सापडला आहे. हा धातूचा हात 2 हजार वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा शोध देशाच्या उत्तर हिस्स्यात लागला आहे.
या हातावर अनेक प्रतीकं कोरण्यात आली आहेत. हातामध्sय सर्वात वरच्या बाजुला अजब प्रतीकांच्या चार रांगा निर्माण करण्यात आल्या आहेत. ही प्रतीक प्राचीन पॅलियोहिस्पॅनिक भाषांशी निगडित असल्याचे एका नव्या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. प्राचीन काळात स्पेनच्या बास्कमध्ये विकसित झालेल्या भाषेचा ही प्रतीकं हिस्सा असू शकतात. वास्कोन्स समुदायाचे लोक राहत असलेल्या ठिकाणी हा धातूचा हात सापडला आहे.
वास्कोन्स समुदायाचे लोक शिकलेले होते कारण या भागात अनेक गोष्टी लिहिलेल्या वस्तू सापडल्या आहेत. परंतु आता पितळेचा हात मिळाल्यावर या समुदायाच्या लोकांच्या भाषेशी निगडित रहस्यांची उकल होऊ शकते. या हातात एक छिद्रही देखील दिसून आले आहे. याचा वापर घराच्या प्रवेशद्वारावर हाताला टांगण्यासाठी केला जात असावा असे संशोधकांचे सांगणे आहे.
पितळेच्या हातावर लिहिण्यात आलेल्या मजकुराचे पूर्णपणे भाषांतर करण्यात आलेले नाही. यावर एक शब्द सोरियनेकू नमूद असून याचा अर्थ शुभ असा होतो. संशोधक या पितळेच्या हाताद्वारे आणखी रहस्यांची उकल होईल अशी अपेक्षा करत आहेत. वास्कोनिक आणि इबेरियन क्षेत्रांमध्ये अनेक प्राचीन कलाकृती सापडल्या आहेत. हा पितळेचा हात पितळेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ठिकाणीच मिळाला आहे.