कुडाळ महिला रुग्णालयाला 20 लाखाचा निधी

सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांचे आ . वैभव नाईकांनी मानले आभार कुडाळ सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांच्याकडून कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयासाठी २० लाख रुपयाचा सी.एस.आर.फंड केला आहे.या रुग्णालयातील आवश्यक सुविधा पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. हा निधी दिल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी श्री ठाकूर यांचे आभार मानले तसेच त्यांनी रुग्णालयाचा […]

कुडाळ महिला रुग्णालयाला 20 लाखाचा निधी

सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांचे आ . वैभव नाईकांनी मानले आभार
कुडाळ
सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांच्याकडून कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयासाठी २० लाख रुपयाचा सी.एस.आर.फंड केला आहे.या रुग्णालयातील आवश्यक सुविधा पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. हा निधी दिल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी श्री ठाकूर यांचे आभार मानले तसेच त्यांनी रुग्णालयाचा आढावा घेतला. या रुग्णालयाच्या अपूर्ण सोयीसुविधाना निधी देण्यास राज्यसरकार असमर्थ ठरल्याची टीका आमदार श्री नाईक यानी केली.आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाला भेट दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडून रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. ज्या सुविधांची आवश्यकता आहे आणि ज्याना सुविधा मंजूर आहेत. त्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा केली. रुग्णालयातील फर्निचरसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची वारंवार मागणी करून देखील महायुती सरकारने निधी मंजूर केला नाही, असा आरोप श्री नाईक यानी केला.महिला बाल रुग्णालयाच्या पाठपुराव्यामुळे सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांनी रुग्णालयासाठी २० लाख रु. चा सी.एस.आर.निधी दिला आहे. त्याबद्दल त्यांनी श्री ठाकूर यांचे आभार मानले. सी.एस.आर. फंडातून लवकरच फर्निचर खरेदी केले जाणार आहे. त्याचबरोबर रुग्णालयात ब्लड बँक स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळविण्यासाठी आमदार नाईक प्रयत्न करीत आहेत. तसेच अन्य आवश्यक सोयीसुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठीची कार्यवाही करावी , अशा सूचना त्यांनी डॉ पाटील यांना दिल्या.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे, एस टी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, युवासेना कुडाळ तालुका प्रमुख योगेश धुरी,सुशील चिंदरकर,दीपक आंगणे, राजू गवंडे, युवा सेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर,सुधीर राऊळ,स्वप्नील शिंदे, डॉ. सुशांता कुलकर्णी, डॉ. सौ.वजराटकर उपस्थित होते.