कल्याण मध्ये 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

बदलापूरच्या घटनेला काहीच दिवस झाले आहे. आता कल्याण मधून माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. ठाण्याच्या कल्याण येथे एका 2 वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शुक्रवारी घडली. चिमुकली दुपारच्या वेळी घराच्या बाहेर खेळत असताना आरोपीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत पळवून नेले आणि चिमुकलीला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीला वेदना होऊ लागल्या नंतर ती रडत रडत घरी गेली. तिला पाहून तिच्या पालकांना काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला त्याने मुलीला तातडीने रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. हे ऐकून मुलीच्या पालकांना धक्काच बसला. त्यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे आरोपीच्या विरोधात बीएनएक्स आणि पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला 6 सेप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited by – Priya Dixit  

Go to Source