नागपूर रेल्वे स्थानकावर काँक्रीट स्लॅबने हल्ला करत दोघांना चिरडले, 2 जखमी

नागपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी एका माथेफिरूने रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांवर काँक्रीट स्लॅब ने हल्ला केला. या मध्ये दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. सरकारी रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली.

जीआरपीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, माथेफिरूने सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर काँक्रीट स्लॅब ने दोघांना चिरडले. लोकांनी आरडाओरडा केल्यावर जीआरपी गस्ती पथक घटनास्थळी पोहोचले .आणि आरोपीला ताब्यात घेतले.  

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्याकडे रेल्वेचे तिकीट सापडले नसून तो मानसिक आजारी असल्याचे दिसून येते. 

या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरु आहे. या प्रकरणात आरोपीवर जीआरपीने हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. 

Edited by – Priya Dixit 

Go to Source