विरार : तलावात पोहताना 2 मुलांचा बुडून मृत्यू
गुरुवारी संध्याकाळी विरार इथल्या तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एकाला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. पापडखिंड धरणाजवळील गस्पाडा परिसरातील एका तलावात ही घटना घडली. विवेक मुन्लापुरी (10) आणि मनीष सुतार (11) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही प्रथमेश नगर येथील रहिवासी आहेत, असे हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.विरार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिन्ही मुले दुपारी तलावात पोहण्यासाठी गेली होती. पण फार खोल असल्याचे त्यांना माहिती नव्हते. पाण्यात उतरताच त्यांना तरंगत राहण्यासाठी संघर्ष करावा लागला.आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी धावले. त्यांनी एका मुलाला वाचवण्यात यश मिळवले आणि त्याला वेळीच सुरक्षित ठिकाणी आणले. पण विवेक आणि मनीष यांना वाचवता आले नाही. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध मोहिमेनंतर 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेअग्निशमन विभागाला तात्काळ सूचना देण्यात आली आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. शोधमोहीम राबवल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. विरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.अलीकडेच ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका निवासी सोसायटीमध्ये पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 11 फेब्रुवारी रोजी मुलगा सोसायटीच्या आवारात खेळत असताना, त्याच्या आईसोबत नातेवाईकाच्या घरी गेला होता तेव्हा ही घटना घडली.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, खेळत असताना मुलगा पाण्याच्या टाकीत घसरला. त्याच्या कुटुंबाला तो सापडला नाही तेव्हा त्यांनी संपूर्ण परिसरात शोध सुरू केला. कुटुंबाने त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कासारवडवली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि घटनेचा अधिक तपास करत आहेत.हेही वाचागोरेगाव फिल्मसिटी शेजारील आंबेवाडी परिसरातील घरांना भीषण आग
वसई मेट्रोच्या सर्वेक्षणाच्या कामास अखेर सुरूवात
Home महत्वाची बातमी विरार : तलावात पोहताना 2 मुलांचा बुडून मृत्यू
विरार : तलावात पोहताना 2 मुलांचा बुडून मृत्यू
गुरुवारी संध्याकाळी विरार इथल्या तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एकाला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे.
पापडखिंड धरणाजवळील गस्पाडा परिसरातील एका तलावात ही घटना घडली. विवेक मुन्लापुरी (10) आणि मनीष सुतार (11) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही प्रथमेश नगर येथील रहिवासी आहेत, असे हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
विरार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिन्ही मुले दुपारी तलावात पोहण्यासाठी गेली होती. पण फार खोल असल्याचे त्यांना माहिती नव्हते. पाण्यात उतरताच त्यांना तरंगत राहण्यासाठी संघर्ष करावा लागला.
आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी धावले. त्यांनी एका मुलाला वाचवण्यात यश मिळवले आणि त्याला वेळीच सुरक्षित ठिकाणी आणले. पण विवेक आणि मनीष यांना वाचवता आले नाही. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध मोहिमेनंतर 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले
अग्निशमन विभागाला तात्काळ सूचना देण्यात आली आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. शोधमोहीम राबवल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. विरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
अलीकडेच ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका निवासी सोसायटीमध्ये पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 11 फेब्रुवारी रोजी मुलगा सोसायटीच्या आवारात खेळत असताना, त्याच्या आईसोबत नातेवाईकाच्या घरी गेला होता तेव्हा ही घटना घडली.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, खेळत असताना मुलगा पाण्याच्या टाकीत घसरला. त्याच्या कुटुंबाला तो सापडला नाही तेव्हा त्यांनी संपूर्ण परिसरात शोध सुरू केला.
कुटुंबाने त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कासारवडवली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि घटनेचा अधिक तपास करत आहेत.हेही वाचा
गोरेगाव फिल्मसिटी शेजारील आंबेवाडी परिसरातील घरांना भीषण आगवसई मेट्रोच्या सर्वेक्षणाच्या कामास अखेर सुरूवात