तेलंगणा सरकारकडून 2.91 लाख कोटीचा अर्थसंकल्प

हैदराबाद : तेलंगणा सरकारने गुरुवारी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 2.91 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारने कृषी क्षेत्रासाठी 72,659 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर शिक्षण विभागासाठी 21,29 कोटी आणि सिंचनासाठी 22,301 कोटी रुपये राज्य सरकारने राखून ठेवले आहेत. तेलंगणावरील कर्जाचा […]

तेलंगणा सरकारकडून 2.91 लाख कोटीचा अर्थसंकल्प

हैदराबाद : तेलंगणा सरकारने गुरुवारी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 2.91 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारने कृषी क्षेत्रासाठी 72,659 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर शिक्षण विभागासाठी 21,29 कोटी आणि सिंचनासाठी 22,301 कोटी रुपये राज्य सरकारने राखून ठेवले आहेत. तेलंगणावरील कर्जाचा भार 6.71 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.