Satara : तळमावलेत रात्रीची ऊस वाहतूक ठरतेय धोकादायक

            रिफ्लेक्टर न लावताच बिनधास्त वाहतूक, अपघातांना मिळतेय निमंत्रण तळमावले : सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू झाल्यामुळे रस्त्यांवरून उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. या वाहनांना ऊस वाहतुकीवेळी पाठीमागे रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक असताना ते न लावता बिनधास्तपणे वाहतूक करताना दिसत आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याकडे संबंधित विभाग […]

Satara : तळमावलेत रात्रीची ऊस वाहतूक ठरतेय धोकादायक

            रिफ्लेक्टर न लावताच बिनधास्त वाहतूक, अपघातांना मिळतेय निमंत्रण
तळमावले : सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू झाल्यामुळे रस्त्यांवरून उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. या वाहनांना ऊस वाहतुकीवेळी पाठीमागे रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक असताना ते न लावता बिनधास्तपणे वाहतूक करताना दिसत आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक आपल्याच धुंदीत गाण्याचा मोठा आवाज करत वाहन चालवत असल्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
ट्रॅक्टरचालक दोन ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करतात. वाहनचालक वाहन थांबवताना रस्त्याच्या मध्येच थांबवितात. त्यामुळे अपघात होऊ शकतो. अनेक वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. काही वाहनांवर तर चक्क ल्पवयीन चालक असल्याचे आढळून आले आहे. रात्रीच्या वेळीही वाहन रस्त्याच्या मध्येच उभी करताना ट्रेलरला रिफ्लेकटर, रेडीयम किंवा सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे वाहनधारकांना उभी केलेला उसाने भरलेला ट्रेलर दिसून येत नाही. त्यामुळे वाहने ट्रेलरला पाठीमागून धडकण्याची शक्यता जास्त आहे.
मोठ्या आवाजात लावलेली गाणीदेखील अपघातास कारण

काही ट्रॅक्टरचालक ऊस वाहतूक करत असताना ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून उसाची वाहतूक करत असतात. त्यामुळे पाठीमागून पुढे येण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या वाहनाने कितीही मोठ्या प्रमाणात हॉर्न दिला तरीही गाणी लावलेले ट्रॅक्टरचालक वाहनाला जागा देत नाहीत.